Sunday, August 31, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’

mh13news.com by mh13news.com
2 months ago
in आरोग्य, धार्मिक, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’
0
SHARES
12
VIEWS
ShareShareShare

सार्वजनिक आरोग्य विभागाने वारी मार्गावर पुरविली ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा
विविध माध्यमांतून आरोग्य जनजागृती

mh 13 news network

सोलापूर – आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने ९ लाख २३ हजार ५०९ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरविली असून, परतीच्या वारीमध्येही दि. 10 जुलैपर्यंत विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंत एकूण १,११४ वारकऱ्यांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे. त्यामुळे या वारकऱ्यांना जीवनदान मिळाले आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविली.

या उपक्रमाच्या माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली. ५ चित्ररथांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. वारकऱ्यांना पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी विभागाचे ४,३७६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ रात्रंदिवस कार्यरत होते.

पालखी मार्गावर वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहायक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर ‘आपला दवाखाना’ तात्पुरता उभारण्यात आला होता. तातडीच्या आरोग्य सेवेसाठी फिरत्या दुचाकी वाहनासह आरोग्यदूत तैनात ठेवण्यात आले होते. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने प्रत्येक ठिकाणी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही, त्यामुळे फिरते दुचाकी आरोग्यदूत प्रथमोपचार पेटीसह सज्ज ठेवण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना तातडीची आरोग्य सेवा पुरविण्यात आली. याशिवाय १०२ व १०८ या क्रमांकाच्या अॅम्बुलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत होत्या. पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली होती. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सुविधा देण्यात आली. पुणे परिमंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन २ आरोग्य पथके सुसज्ज रुग्णवाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत होते .

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दरम्यान ३,५६,३८९ वारकऱ्यांना, श्री संत तुकाराम महाराज पालखी दरम्यान २,२९,१८३ तर श्री संत सोपानकाका महाराज पालखी दरम्यान १९,३६४ वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मानाच्या इतर पालख्या व दिंड्यांमध्ये ८५,३८६ वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे. पंढरपूर – संस्था व एचबीटी (बूथ) मध्ये ६२,६७० वारकऱ्यांना, पंढरपूर – उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा आयसीयू.मध्ये ८६,९२२ वारकऱ्यांना तसेच तीन रस्ता शिबिरामध्ये ८३,५९५ वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. आरोग्य सेवा पुरविण्यात आलेल्या बाह्यरुग्ण संख्या ९,१८,४९९ तर आंतररुग्ण संख्या ५,०१० अशी एकूण ९,२३,५०९ वारकरी भक्तांना आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावर पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची वैशिष्ट्ये –

  • पालखी सोहळा २०२५ साठी एकूण मनुष्यबळ – ४,३७६
  • प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ – २०३
  • वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका २४*७ उपलब्ध – ३३१
  • दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – ३५००
  • महिला वारकऱ्यांसाठी रुग्णालयामध्ये कार्यरत स्त्री रोग तज्ज्ञ – १५
  • पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष – ३७
  • पालखी मार्गावर आरोग्य दूत – २९०
  • सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावर पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची वैशिष्ट्ये –
  • पालखी सोहळा २०२५ साठी एकूण मनुष्यबळ – ४,३७६
  • प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ – २०३
  • वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका २४*७ उपलब्ध – ३३१
  • दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – ३५००
  • महिला वारकऱ्यांसाठी रुग्णालयामध्ये कार्यरत स्त्री रोग तज्ज्ञ – १५
  • पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष – ३७
  • पालखी मार्गावर आरोग्य दूत – २९०
  • पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – ५
  • पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – ४६
  • आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.
  • विविध माध्यमाद्वारे आरोग्य जनजागृती.
  • पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व त्याअंतर्गत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने तपासणी.
  • पालखी मार्गावर १८६ टँकरव्दारे शुध्द पाणी पुरवठा व मुक्कामाच्या ठिकाणी धुर फवारणी.
  • पाण्याच्या सर्व स्रोतांची ओटी टेस्ट तसेच आरोग्य संस्थांमार्फत जैवकचरा विल्हेवाट.
  • पालखी सोबत माहिती, शिक्षण व संद

Previous Post

‘चिमुकल्यांची वारी, ‘गुरुकुल’च्या दारी ; रंगला भक्तिभावपूर्ण रिंगण सोहळा

Next Post

पालखी मार्गावर ११ हजार शौचालयांची सुविधा.! ग्राम विकासाच्या निर्मल वारीस मिळतोय वारकऱ्यांचा आशीर्वाद..!

Related Posts

मराठा आंदोलकांसाठी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून अन्नछत्र, पिण्याचे पाणी..
महाराष्ट्र

मराठा आंदोलकांसाठी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून अन्नछत्र, पिण्याचे पाणी..

31 August 2025
गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर !
राजकीय

गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर !

30 August 2025
लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपस्थिती
महाराष्ट्र

लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपस्थिती

30 August 2025
मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न; आंदोलकांशी चर्चेसाठी सरकारचा निर्णय
महाराष्ट्र

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न; आंदोलकांशी चर्चेसाठी सरकारचा निर्णय

30 August 2025
क्रीडा दिनानिमित्त सोलापूरमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शकांचा गौरव
महाराष्ट्र

क्रीडा दिनानिमित्त सोलापूरमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शकांचा गौरव

30 August 2025
डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा – प्रभू गौर गोपाल दास
महाराष्ट्र

डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा – प्रभू गौर गोपाल दास

30 August 2025
Next Post
पालखी मार्गावर ११ हजार शौचालयांची सुविधा.! ग्राम विकासाच्या निर्मल वारीस मिळतोय वारकऱ्यांचा आशीर्वाद..!

पालखी मार्गावर ११ हजार शौचालयांची सुविधा.! ग्राम विकासाच्या निर्मल वारीस मिळतोय वारकऱ्यांचा आशीर्वाद..!

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.