शेखर म्हेत्रे । माढा प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे माढा मार्गे पायी दिंडीतून जाणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करत माढ्यातील ध्येय प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

माढा शेटफळ रोडवर चहा व थंड पाण्याचे वाटप करण्यात आले, तसेच पायात चप्पल नसलेल्या १०० वारकऱ्यांना चप्पल वाटण्यात आल्या.प्रखर ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता विठुरायाच्या दर्शनासाठी चालत येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वारकऱ्यांचा उत्साह आणि श्रद्धा पाहता अशा छोट्याशा सेवेमुळे मनाला समाधान मिळते, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.
या उपक्रमात ध्येय प्रतिष्ठानचे संस्थापक दिनेश गाडेकर, अध्यक्ष अरविंद कांबळे, उपाध्यक्ष भैय्या खरात, यासिन शेख, राहुल कांबळे, प्रशांत वेळापुरे, जहीर मणेर, नगरसेवक चंदू कांबळे, डॉ. यु. एफ. जानराव, सुदाम कांबळे, अण्णासाहेब खंडागळे, महेश बोधले, बाळू चवरे, शुभम चवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.