अक्कलकोट | प्रतिनिधी
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित बैठकीत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष सातलिंग शटगार यांचा सत्कार करण्यात आला. ही बैठक अक्कलकोट येथील अध्यापक विद्यालय येथे जिल्हाध्यक्ष शटगार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तसेच सोलापूरचे निरीक्षक मोहन जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा होत्या.तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी जिल्हाध्यक्ष शटगार यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या प्रसंगी युवक काँग्रेसच्या नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या अवघी ३५ कोटी होती.

त्या काळात देशाला भूकमुक्त करण्याचे मोठे आव्हान होते. पंडित नेहरूंनी पंचवार्षिक योजना, धरण प्रकल्प, हरितक्रांती आणि औद्योगिक विकासाच्या माध्यमातून देशाचा पाया मजबूत केला. काँग्रेस पक्षाचा या सर्व प्रक्रियेत सिंहाचा वाटा आहे.”ते पुढे म्हणाले,
“खासदार प्रणिती शिंदे या गावागावात फिरून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरतात. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. नगरपरिषद, पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजूट करावी.”

या वेळी माजी नगराध्यक्ष डॉ. मलगोंडा यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना सांगितले की, “भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना केवळ जाहिरातबाजीपुरत्या मर्यादित ठेवते. प्रत्यक्षात बहिणींची फसवणूक होत आहे.”
बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, लक्ष्मण भोसले, सिद्राम पवार, मल्लिनाथ हत्ते, संजय भडके, निशांत कवडे, तसेच तालुक्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन जकिकोर यांनी केले
.Indian National Congress Praniti Shinde Praniti Shinde – प्रणिती शिंदे