Friday, December 5, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in Blog
0
विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

मुंबई : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करून त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या.

मुंबई उपनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्री. कल्याणकर यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, विभागीय उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड आणि अमोल यादव, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ यांच्यासह चारही लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, विविध कक्षांचे  जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. कल्याणकर म्हणाले की, निवडणूक आयोगाने ज्या सूचना आणि निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्या मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय स्वीकारला आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचून ही प्रक्रिया सुलभपणे पार पाडावी. याशिवाय, निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन होईल, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मुंबई उपनगर जिल्ह्याने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी केलेल्या तयारीबाबत त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सी विजील ॲप वर आलेल्या तक्रारीची वेळेत दखल घेऊन त्या तक्रारींचा वेळेत निपटारा करावा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांना कमीत कमी वेळेत मतदान करून बाहेर पडता येईल, अशी व्यवस्था असावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

निवडणूक कालावधीत उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यासाठीं नियुक्त पथकाने तसेच व्हिडिओ पथक, भरारी पथक यांनी सतर्क राहावयाचे आहे. बँकांकडून संशयित बँक व्यवहारांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना दैनंदिन अहवालाच्या स्वरूपात पाठवली जावी. याबाबत बँकांना सूचना द्याव्यात. अवैध मद्य वाहतुकीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती दक्षता घेतली जावी. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल, यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री क्षीरसागर यांनी, जिल्ह्यातील चारही मतदारसंघात निवडणूक विषयक तयारीची माहिती यावेळी दिली. जिल्हा निवडणूक यंत्रणा ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास सज्ज असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Previous Post

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

Next Post

मालवणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!
Blog

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!

4 December 2025
महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम
Blog

महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम

15 November 2025
सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश इजाजुद्दीन काझी आणि त्यांचे स्टेनो चंद्रकांत वसुदेव यांना लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक
Blog

सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश इजाजुद्दीन काझी आणि त्यांचे स्टेनो चंद्रकांत वसुदेव यांना लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक

14 November 2025
शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध
Blog

शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

11 November 2025
“शिवणी” अन्यत्र  स्थलांतर करण्याची  माजी आमदार दिलीप माने यांची मागणी..! हे आहे कारण..
Blog

“शिवणी” अन्यत्र स्थलांतर करण्याची माजी आमदार दिलीप माने यांची मागणी..! हे आहे कारण..

30 October 2025
वैभव वाघे खून प्रकरण: पुरवणी दोषारोपपत्र दाखल; जेल बदलाचा अर्ज मागे
Blog

Vaibhav waghe Murder Case | समरसेनजीत गायकवाडसह चौघांच्या जामीनवर..Update

16 October 2025
Next Post
मालवणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.