भारतीय संस्कृती ही सण उत्सवाने परिपुर्ण आहे.इथ वर्षेंवर्षे वेगवेगळ्या जाती पंथाचे लोक गुण्या गोविंदाने राहतात पण एक दिवाळी असा सण आहे जिथे लोक वर्षापासून तयारी करतात जस की एखादी महाग वस्तू खरेदी ,सोन खरेदी किंवा कपडे खरेदी बहाणा फक्त दिवाळीची वाट बघतात मग तो सरकारी कर्मचारी असो खाजगी प्रत्येक जण अगदी बिगारी कामकरणारा देखील दिवाळी सणाची अतुरतेने वाट बघतात.
व्यापारी वर्गास ही दिवाळी आनंद देऊन जाते परंतु समाजातला असा एक घटक आहे ज्याला स्वतःच पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागतो
तिथ दिवाळीत अभ्यंग स्नान नवे कपडे फराळ भरला आहेर हया गोष्टी तर दुरच आहे
हीच कमतरता
आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँकेला जाणवली
दिपावली वंचितांसोबत
आजही समाजातील हा घटक अंध,अपंग ,निराधार,अनाथ ज्येष्ठ व मुले आहेत ज्यांना एकवेळच जेवण मिळवण्यासाठी ही संर्घष करावा लागतो तर मग तिथे दिवाळीसारखा मोठा सण कसे साजरे करु शकतील?हयाच प्रश्नाला आपल्या सर्वांच्या सहयोगाने यंदाची दिवाळी वंचितांसोबत करत आहोत तरी आपण हया कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहावे ही विनंती
कार्यक्रमाची रुपरेषा
प्रथम रस्त्यावरिल भिक्षुकांना दिवाळीतील अभ्यंग स्नान
त्यांना नवीन कपडे वाटप
औक्षण
मुख्य कार्यक्रमासाठी सभामंडपात बैठक व्यवस्था
मान्यवरांच स्वागत
मनोगत
आभार प्रर्दशन
मुख्य कार्यक्रम वंचितांना नवीन कापडे वाटप फराळ वाटप
ज्येष्ठ अनाथ बालक
कार्यक्रमाची वेळ सकाळी 11 वाजता
ठिकाण ः अथर्व गार्डन
घोंगडे वस्ती जवळ सोलापुर
हया कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली ती
माननीय सुरेश (आण्णा )पाटील
माननीय शिवरत्न शेटे शिवचरित्र व्याख्याते
मा. बाळासाहेब वाघमारे.
मा.डाॕ.सोनाली घोंगडे
मा.अॕड.निता मंकणी
मा. राजू हौशेट्टी
मा.राजेश हलकुडे
मा.अमित कांबळे
मा.वैशलीताई सुरवसे
मा.विजयाताई सुरवसे
या. सुरेश बाबू मंकणी
मा.योगेश कुंदुर
मा. श्याम पाटील
इत्यादी मन्यावरांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भुषवले
अध्यक्षिय भाषणात सुरेश आण्णा पाटील यांचे मनोगतामध्ये आस्था रोटी फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बॕकेच्या श्री.विजय छंचुरे सरांना कर्णाचा अवताराची उपमा दिली जस महाभारतात कर्ण ला दानशुर म्हणून ओळखले जाते तिथे आजच्या युगात सोलापुरातील दानशुर कर्णाचा अवतार म्हणटले तर वावगे ठरणार नाही
तर शिवचरित्र व्याख्याते शिवरत्न शेटे यांनी तर कार्यक्रमाचे वातावरणात दानत्त्त्वाचे महत्त्व सांगितले सोलापुरातील विविध महापुरुषांच्या या पावन भुमीत समाजसेवेचे संघटन सोलापुरत च बीज रोवल गेल आणि आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँकेमुळे आज अश्या वंचितांना कुणी अंध आहे तर कुणी अपंग तर कुणी निराधर ज्येष्ठ त्यांच्या चेहऱ्यावर जो खरा आनंद दिसतोय ते फक्त आणि फक्त आस्था रोटी बँकेमुळे
समाजातील हा वंचित वर्ग ज्यांनी एकदाही घरावर आकाशदिवे लावले नाहीत तिथे हया संस्थेने आकाश दिवा लावुन दारी पणत्या व दिवाळीसाठी शिधा वाटप करुन दिवाळी साजरी केली खरच धन्यता वाटते खरच धन्यवाद आस्था नावातच सर्व सार आहे.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले आयोजक नियोजक श्री. विजय छंचुरे
सौ.संगिता छंचुरे
निलिमा हिरेमठ ,कांचन हिरेमठ ,छाया गंगणे ,अनिता तालीकोटी ,कल्पना कोळी,गीता भोसले,स्नेहा वनक्रुद्रे ,स्नेहा मेहता,पुष्कर पुकाळे,आकाश तालीकोटी , ,विघा माने,मंगल पांढरे,सुरेखा पाटील, सोलापूरकर, इत्यादी
सधारपणे कार्यक्रमासाठी आलेलेल्या अंध अपंग कुष्ठ रोगीं असे 200/300 वंचितांना मोफत नवे कपडे फराळ वाटप केले गेले तर
700 लोकांना फराळ पॕकिट वाटप केले गेले! कार्यक्रमाचे सुत्रसंचलन छाया गंगणे यांनी केल तर प्रस्तावना स्नेहा वनक्रुद्रे तर आभार पुष्कर पुकाळे यांनी मानले