Thursday, August 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

डॉ. भगवान पवार यांचे निलंबन महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
डॉ. भगवान पवार यांचे निलंबन महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

आरोग्य सेवा उपसंचालक यांची माहिती

मुंबई : जिल्हा परिषदेचे तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांच्याविरुद्ध विविध तक्रारी प्राप्त होत्या. यामध्ये आर्थिक भ्रष्ट्राचार, लैंगिक छळ आदींचा समावेश होता. या प्रलंबित तक्रारींची दखल राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने घेऊन सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार डॉ. पवार यांचे निलंबन महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार करण्यात आले आहे, असे उपसंचालक, आरोग्य सेवा यांनी स्पष्टीकरणात कळविले आहे.

डॉ. भगवान पवार यांना बडतर्फ नव्हे तर निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात चौकशी अधिक नि:पक्षपातीपणे व्हावी यासाठी त्यांना नंदुरबार येथे मुख्यालय देण्यात आले आहे. या चौकशीदरम्यान त्यांना आणि संबंधित तक्रारदारांना आपले म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी असणार आहे

.

डॉ. भगवान पवार यांच्याविरुद्ध कंत्राटी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्याशिवाय अनियमित कामकाज, अधिकारी/कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे, आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप अशा स्वरुपाच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या. सतत तक्रारी प्राप्त होत असल्याने २९ एप्रिल रोजी आरोग्य सेवा आयुक्तालयाने सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असलेली तीन सदस्य‍ीय चौकशी समिती स्थापन केली होती.

डॉ. पवार यांच्या विरुद्ध असणाऱ्या तक्रारीसंदर्भात सखोल चौकशी करुन समितीने अहवाल दिला. त्यानुसारच डॉ. पवार प्रथमदर्शनी दोषी आढळून आले व त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. डॉ. पवार यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4 (1) (अ) मधील तरतुदीनुसार निलंबित करण्यात यावे तसेच निलंबन कालावधीत डॉ. पवार यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, नंदूरबार येथे ठेवण्यात यावे अशी चौकशी समितीने शिफारस केली व त्यानुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे, तसेच पुढील सविस्तर चौकशी व विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. यात कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून डॉ. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. डॉ. पवार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तीचे पालन करणे आवश्यक असताना त्यांनी त्याचा भंग केला असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous Post

सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथी प्रीतीचे बारावी परीक्षेत यश 

Next Post

६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
Next Post
६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.