धुळे, : धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डॉ.शोभा दिनेश बच्छाव या 3 हजार 831 मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी घोषित केले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 02- धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज शासकीय गोदाम, नगावबारी, देवपूर, धुळे येथे सकाळी 8 वाजता केंद्रीय निवडणूक निरीक्षक पूर्ण चंद्र किशन, मतमोजणी निरीक्षक एस.मालती यांच्या उपस्थितीत फेरीनिहाय मतमोजणी शांततेत पार पडली. यावेळी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.
02- धुळे लोकसभा मतदार संघासाठी 20 मे रोजी मतदान पार पडले. या मतदार संघात नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण या तीन विधानसभा मतदार संघाचा तर धुळे जिल्ह्य़ातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा या तीन असे एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघाच्या मतमोजणीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांना एकूण 5 लाख 83 हजार 866 मते मिळाली असून श्रीमती. बच्छाव या 3 हजार 831 इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवाराना मिळालेली एकूण मते :-
1) जहूर अहमद मोहम्मद युसूफ (जम जम) (बहुजन समाज पाटी)-4973
2) श्रीमती शोभा दिनेश बच्छाव (इंडियन नॅशनल काँग्रेस ) -583866
3) सुभाष रामराव भामरे (भारतीय जनता पार्टी )-580035
4) नामदेव रोहिदास येळवे (भारतीय जवान किसान पार्टी )-3683
5) पाटील शिवाजी नाथू (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)-1001
6) मुकीम मिना नगरी ( भीम सेना )-781
7) शेख मोहम्मद जैद शमीम अहमद (वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया )-951
8) अब्दुल हफीज अब्दुल हक ( अपक्ष )-577
9) इरफान मो.इसहाक (नादिर ) ( अपक्ष )-763
10) भरत बाबुराव जाधव ( अपक्ष )-19713
11) मलय प्रकाश पाटील ( अपक्ष )-736
12) मोहम्मद आमीन मोहम्मद फारुख (अपक्ष )-835
13) मोहम्मद इस्माईल जुम्मन (अपक्ष)-1085
14) राज चव्हाण (अपक्ष)-3452
15) शफीक अहमद मोहम्मद रफीख शेख (अपक्ष)-3707
16) ॲड. सचिन उमाजी निकम (अपक्ष )-3660
17) सुरेश जगन्नाथ ब्राम्हणकर (सुरेश बापू) (अपक्ष)-1038
18) संजय रामेश्वर शर्मा (अपक्ष)-3746
19) नोटा-4693