Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पावसाळ्यातील पूर टाळण्यासाठी आयुक्तांची मैदानात उतरून पाहणी; हैदराबाद रोडवरील नाल्यांचे काम तपासले

mh13news.com by mh13news.com
2 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
पावसाळ्यातील पूर टाळण्यासाठी आयुक्तांची मैदानात उतरून पाहणी; हैदराबाद रोडवरील नाल्यांचे काम तपासले
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

हैदराबाद रोड परिसरातील पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची पाहणी; ड्रेनेज पाणी मिसळण्यावर कडक नाराजी

सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील हैदराबाद रोड, विडी घरकुल परिसरातील पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये नाला क्र. २० (पोगुल विहार ते हैदराबाद रोड) व नाला क्र. २१ (हैदराबाद रोड ते आदर्श नगर) या सुरू असलेल्या कामाचा समावेश होता.

सदर प्रकल्प सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) राबविण्यात येत असून, पर्जन्य जलवाहिनीचे योग्य प्रकारे ट्रेनिंग करणे, काही ठिकाणी नाले बंदिस्त करणे तसेच आवश्यक ठिकाणी पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. पर्जन्य जलवाहिनी ही मुख्यतः पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असते. मात्र, शहरातील काही भागात या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी मिसळून ते वर्षभर वाहत असल्याचे निदर्शनास आले.

पर्जन्य जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी मिसळणे हे आरोग्यास अपायकारक व नियमबाह्य असून, यामुळे पावसाळ्यात नाले ओव्हरफ्लो होणे, सखल भागांमध्ये पाणी साचणे तसेच रहिवासी व झोपडपट्टी भागात पाणी शिरण्यासारख्या समस्या निर्माण होतात, असे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता, वेळापत्रक व सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. पर्जन्य जलवाहिनी व ड्रेनेज यांची स्पष्टपणे स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी तसेच भविष्यात शहरात पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, एन्व्हायरोसेफ कन्सल्टंटचे टीम लीडर गोकुळ चितारी यांच्यासह हर्षवर्धन बुबणे, रेसिडेंट इंजिनिअर चंद्रकांत गुंडे, रोहन तोगरे, रोहित गोडगे, प्रोजेक्ट मॅनेजर सचिन लकारे, साईट इंजिनिअर चरणू शिंदे, राहुल यातकर, मनोज जाधव, सागर करोसेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीचे मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून कौतुक

Next Post

आमदार कोठेंची खेळी सफल! घोडके गट भाजपच्या मैदानात; विरोधक बॅकफूटवर

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
आमदार  कोठेंची खेळी सफल! घोडके गट भाजपच्या मैदानात; विरोधक बॅकफूटवर

आमदार कोठेंची खेळी सफल! घोडके गट भाजपच्या मैदानात; विरोधक बॅकफूटवर

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.