MH 13News Network
आज मंगळवारी सायंकाळी अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि पक्ष दोन्ही मिळाला असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठा जल्लोष करण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे.
या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे. दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे.
शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत नवं नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालय येथे जल्लोष करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यां समवेत गुलालाची मुक्त उधळण करत हलग्याच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठा जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड,जेष्ठ नेते, हेमंत दादा चौधरी, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, प्रशांत जाकलेकर, मौल्ला पटेल, श्रीनिवास गायकवाड,किरण शिंदे, आमोल जगताप, रमेज मुल्ला,ऋषभ प्याटी, फारूख बागवान, उत्कर्ष गायकवाड, ओंकार जाधव, आदिल जाधव, उमेश जाधव,दर्याप्पा पुजारी, दिनेश आवटे, सोनू पटेल,हुल्लगाप्पा शासम, ऋषी येवले, जयेश कॅंडी जाधव, तेजस गायकवाड, गणेश याळगी,शितल क्षिरसागर, माणिक कांबळे, महादेव राठोड, रवी सराटे, श्रीकांत घोडके, आमोल कोळी, सिकंदर शेख,शुशात वाघमारे, शिवाजी चाबुकस्वार, आदी राष्ट्रवादी पक्षाचे युवक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
घड्याळ तेच, वेळ नवी आहे या वेळेनुसारच..
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे संधी आम्हाला मिळाली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आज प्रामाणिकपणे न्याय मिळाला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पक्षाच्या बळकटीसाठी कार्य करणार आहे. सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकास साठी आगामी काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्य करू, घड्याळ तेच वेळ नवी आहे या वेळेनुसार आपण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात कार्य करू
किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी