Sunday, October 12, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापुरातील ब्रिटिशकालीन 1881चे जातीचे पुरावे; मोहोळमधील डॉक्टर कुटुंब थेट अंतरवाली सराटीत..

MH13 News by MH13 News
1 year ago
in Blog, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
2.7k
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेसाठी आणि शासनाच्या पुराव्यासाठी जनगणनेची आणि ब्रिटिश काळातील महत्त्वाचे पुरावे देण्यासाठी मोहोळ मधील डॉक्टर दांपत्य जरांगे पाटलांना भेटले तेव्हा त्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे त्यांना सुपूर्त केली. सोलापुरातील सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, मोहोळ मधील आंदोलनाचे नेते ॲड. श्रीरंग लाळे,पंडित ढवण,दाजी काकडे आदी समाजबांधव उपस्थित होते.

ब्रिटिश काळातील सोलापूर जिल्ह्यातील जातीनिहाय जनगणने बाबत मोहोळ तालुक्यात मराठा आरक्षणासाठी अग्रभागी असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ. प्रमोद पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.स्मिता पाटील यांनी अंतरावली सराटीत सोलापुरातील शिष्टमंडळासह जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जवळपास दोन ते अडीच तास विविध विषयांवर चर्चा होऊन पाटलांकडे महत्त्वाची कागदपत्रे देण्यात आली.



काय होते त्या कागदपत्रात..?
डॉ. स्मिता पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेतून त्यांनी दिलेली माहिती..

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या या देशामध्ये विविध जाती,जमाती काळापासून पूर्वापार एकदिलाने नांदत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी जातीनिहाय जनगणना करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम अतिशय नियोजन पूर्वक पार पाडले. त्याकाळी तंत्रज्ञान फारसे प्रगत नसतानाही अत्यंत चिकित्सापूर्वक सर्व जातींची जनगणना अचूक पद्धतीने केली. आज भारताच्या विविध राज्यांमध्ये आरक्षणाचा लढा तीव्र होत असताना अशा जनगणनेची तीव्र स्वरूपात निकड भासत आहे. तत्कालीन ब्रिटिश जनगणनेची अचूक आकडेवारी सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ, अभ्यासक, कादंबरीकार विश्वास पाटील यांनी अतिव परिश्रमाने गोळा केली आहे. आरक्षणासारख्या गंभीर समस्येमध्ये सरकारला या आकडेवारीची मोलाची मदत होणार आहे. ही माहिती सरकारला आरक्षण प्रश्नाची कोंडी फोडण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.



विश्वास पाटील यांच्या मते..

17 फेब्रुवारी 1881 या दिवशी ब्रिटिशांनी केलेल्या  जनगणनेनुसार अक्कलकोट संस्थान सोडून तेव्हाच्या सोलापूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या पाच लाख 82 हजार 487 इतकी होती त्यापैकी दोन लाख 87 हजार 678 स्त्रिया व पुरुषांची संख्या दोन लाख 94 हजार 814 होती. औरंगजेबाने विजापूरवर आक्रमण केल्यानंतर शेवटी औरंगजेब व विजापूरचा आदिलशहा यांच्यामध्ये 1686- 87 च्या करारानुसार सोलापूरचा मुलुख मोगलांच्या ताब्यात दिला गेला. 1817 व 1818 मध्ये झालेल्या पंढरपूर आणि अष्ट्याच्या लढाईनंतर सोलापूरचा तह झाला. त्यानंतर ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने सोलापूर प्रदेशात पाय पसरले.
1838 मध्ये सोलापूरला कलेक्टर ऑफिस सुरू होऊन तिथे खऱ्या अर्थी आधुनिक प्रशासन सुरू झाले. सोलापूरचा कलेक्टर हा तेव्हा शेजारच्या अक्कलकोट संस्थानाचा पॉलिटिकल एजंट म्हणून ब्रिटिश सरकार मार्फत काम पाहत असे.

या जिल्ह्याची पहिली जनगणना ब्रिटिश काळातच 1872 ला झाली तर 1901 च्या जनगणनेनंतर जिल्ह्याची विभागणी सात तालुक्यांमध्ये झाली ब्रिटिशांनी आपल्या जनगणनेच्या शिव्यधनुष्य पेलण्यासाठी भारतभर कसोशीने प्रयत्न केले आहेत. या सर्व जनगणना प्रचंड तयारीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले आहेत त्यासाठी भारतभर प्रशिक्षकांची फौज तयार करून त्यांना दीड वर्ष ट्रेनिंग देण्यात आले होते या कामासाठी झालेल्या सर्व खर्चाच्या नोंदी सुद्धा कागदपत्रात आजहीआढळून येतात. 1901 च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची तेव्हाची लोकसंख्या 7 लाख, 20हजार 977 होती.

1881 च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याचे अक्कलकोट संस्थान सोडता जात वास्तव खालील प्रमाणे..
ब्राह्मण 27,059 धनगर 57, 704 कुणबी- मराठा एक लाख 78 हजार 908 राजपूत 9032, बेरड 3404, भंडारी 23, चांभार 13,523 शिंपी 6,223, धोबी 4,085 न्हावी 5,959 जंगम 3,838 कोळी मराठा 7,530 कोष्टी 10,658, कुंभार 3,852 लिंगायत21,509 लोहार 2,938 माळी 23,808 मांग 19,888 महार 44, 001 सोनार 5,807,सुतार 4,824 ,तेली 6,759, वंजारी 3,397 पठाण4,360, शेख 35,177 सोलापूर जिल्ह्याचे म्हणजे 1884 चे धर्म वास्तव..
हिंदू 5लाख30 हजार 121, मुस्लिम 43 हजार 997, ख्रिश्चन 625, जैन7,519, पारशी 157, शीख 8
तसेच सोलापूर जिल्ह्यातील इतर जातीची नोंद अशी..
वडार 4,082, ढोर 2,058, रामोशी 2,863, गुरव 3,596, भाट 88,
बेलदार 120, बुरुड 343, गवंडी 817, कासार 1212,खत्री 1125, पाथरवट 410,साळी 8,950, लमान 130, बैरागी 904, साधू 365, रंगारी891,होलार 1857,गोंधळी 631,गवळी 1781, खाटीक 686 गोसावी 631, कैकाडी 1510, वाणी 10,231,भुई 1550, बोहरा 65, कनोजी 280, भंगी 28, ओसवाल 846,धनगर 1357.

अंतरवाली सराटीत झालेल्या चर्चेत सोलापुरातील सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, मोहोळ मधील आंदोलनाचे नेते ॲड. श्रीरंग लाळे,पंडित ढवण,दाजी काकडे आदी समाज बांधव उपस्थित होते.



सोलापूर जिल्ह्यात मराठा प्रवर्गामध्ये जनगणना फॉर्म मध्ये सर्वच मराठ्यांची नोंद आडव्या पत्रकात कॉलम13 मध्ये कुणबी- मराठा अशीच नोंदली केली गेली आहे. सोलापूरच्या शेजारी निजाम राजवटीतला नळदुर्ग हा जिल्हा होता. सुरुवातीला 60 ते 70 वर्ष उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव नळदुर्ग जिल्हा असेच होते. सोलापूर तेव्हा मुंबई प्रांतात म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये येत असे. या जिल्ह्याच्या जवळ याच मुंबई प्रांतातला बेळगाव जिल्हा होता. तिथे मात्र ब्रिटिशांनी आपल्या गॅझेट मध्ये मराठ्यांची संख्या 1,19,300 व कुणब्यांची वेगळी संख्या 42 हजार 650 दिली आहे.
1884 मध्ये प्रकाशित झालेल्या बेळगावच्या डिस्ट्रिक्ट गॅजेटमध्ये पान क्रमांक 126 वर कुणब्यांची सुंदर व्याख्या ब्रिटिशांनी ‘Cultivating  Marathas are called Kunbij,Kulvadis’अशी केली आहे.
मात्र सातारा सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष जनगणनेच्या आडव्या पत्रकात कॉलम13 मध्ये कुणबी- मराठा अशाच नोंदी स्पष्टपणे करण्यात आल्या आहेत. त्याची कारणे ही ब्रिटिशांनी आपल्या गॅझेटमध्ये दहा दहा, पंधरा,पंधरा पाने लिहून स्पष्ट केली आहेत.

विश्वास पाटील यांनी दिलेल्या या आकडेवारीनुसार ब्रिटिशांनी  महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष जनगणनेच्या आडव्या पत्रकात कॉलम13 मध्ये कुणबी-मराठा अशा स्पष्ट पणे नोंदी कारणासह केल्या आहेत.यावरून महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आज मराठा आरक्षणासाठी शेकडो  तरुण मुले अतिव निराशे पोटी आत्महत्या करीत आहेत. 
अनेक ओबीसी जाती व्यापार उदिमामुळे आर्थिक दृष्ट्या समृद्ध असून ही आरक्षणाचा लाभ घेत आहेत तर अनेक ओबीसी मधील आर्थिक दृष्ट्या दुरावस्थेत असणाऱ्या जाती आरक्षणापासून वंचित आहेत. जाती गणना केल्यास प्रत्येक जातीची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, लोकसंख्या समोर येईल आणि आरक्षणापासून वंचित असणाऱ्या ओबीसी मधील जातीनाही आरक्षणाचा लाभ होईल.  तसेच केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या,सामाजिक दृष्ट्या,शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल मराठा बांधवांनाही आरक्षण देण्याचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे विश्वास पाटलांनी गोळा केलेल्या या आकडेवारीचा अभ्यास करून जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. राज्यात मराठा आणि कुणबी वेगळ्या जाती नसून एकच आहेत हे जळजळीत सत्य समोर येऊन ही
मराठा आरक्षणाचा गांभीर्याने विचार न करणे म्हणजे पिचलेल्या मराठा समाजावर अन्याय करण्यासारखे आहे.
विश्वास पाटील यांचा प्रशासकीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांनी अभ्यास पूर्वक सादर केलेल्या प्रत्येक जिल्ह्यातील जातीनिहाय जनगणनेच्या आकडेवारीचा उपयोग करून सर्व जातींना न्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने करावा ही
राज्य सरकारला नम्र विनंती.

डॉ स्मिता पाटील,
मोहोळ, सोलापूर

अंतरवाली सराटीत झालेल्या चर्चेत सोलापुरातील सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, मोहोळ मधील आंदोलनाचे नेते ॲड. श्रीरंग लाळे,पंडित ढवण,दाजी काकडे आदी  समाज बांधव उपस्थित होते.

Tags: CMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Chandrakant Patilmanoj Jarange Patilmaratha aarkshanmaratha aarkshan maratha morchaMaratha reservation
Previous Post

ब्रेकिंग : जरांगे पाटील उपोषणावर ठाम ; आज सोमवारी मध्यरात्रीपासून होणार सुरूवात

Next Post

गणेशोत्सवामध्ये पहिल्यांदाच सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद ; बनशंकरी मंडळाचा उपक्रम

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post

गणेशोत्सवामध्ये पहिल्यांदाच सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद ; बनशंकरी मंडळाचा उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.