MH 13 News Network
बाळे भागातील राजेश्वरी नगर येथील रस्त्यांची दुरावस्था, पाईपलाईनचे ठप्प झालेले काम, स्वच्छतेचा वाजलेला बोजवारा याबाबत एम एच 13 न्यूज च्या माध्यमातून बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्यावर प्रभागातील माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. त्यासोबत बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट बाबत संबंधित खात्यांना सांगून लागलीच काम करून घेतले.
राजेश्वरी नगर येथे अनेक दिवसापासून एका बाजूला कचऱ्याचे ढीग साठून राहिलेले होते. स्ट्रीट लाईट बंद होत्या याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये नाराज होती. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी घन कचरा व्यवस्थापन च्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणचा कचरा उचलण्यासाठी जेसीबी आणि डंपर आणला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा दूर झाला आहे. बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट साठी पुजारी यांनी झोन कार्यालयास कळवले होते. परिणामी स्ट्रीट लाईट सुरु झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी याबाबत झोन अधिकारी, इंजिनीयर, व इतर अधिकाऱ्यांची त्यांच्या कार्यालयात बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या होत्या.