MH 13News Network
बनशंकरी गणेशोत्सव मंडळ आयोजित गणेशोत्सवाच्या इतिहासातील पहिल्याच सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद !
जिल्हा विशेष सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे केले उदघाट्न
शेळगी परिसरातील श्री बनशंकरी गणेशोत्सव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या 21 व्या वर्षानिमित्त, यंदा जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता भव्य ‘एकात्मता सायकल रॅलीचे’ आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे ही गणेशोत्सवाच्या इतिहासातील पहिली सायकल रॅली होती.या रॅलीत तब्बल 300 हून अधिक सायकल स्वरांनी सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. प्रारंभी कार्यक्रमास उपस्थित जिल्हा विशेष सरकारी वकील तथा सीबीआय विशेष वकील श्री प्रदीप सिंह राजपूत, जोडभावी पेठ पोलिस हद्दीचे पी.एस.आय. बामणे, सोलापूर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य,प्राध्यापक सारंग तारे, सहस्त्रअर्जुन प्रशालाचे मुख्याध्यापक उमदीकर, एस के बिराजदार प्रशाला चे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर, यश डेव्हलपर्सचे प्रमुख सुयश खानापुरे,ज्ञानपीठ क्लासेस चे प्रमुख प्राध्यापक साखरे, श्री सिद्धेश्वर क्लासेसचे श्री सागर चितळे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रदीप सिंह रजपूत म्हणाले की, सध्या सर्वत्र गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच जर आपण सक्षम युवा पिढी घडवली आणि मुलांना लहान वयातच सामाजिकतेचे भान जपण्याची शिकवण दिली,तर नक्कीच येणारी पिढी ही उज्वल भविष्यासाठी लाभदायक ठरेल, त्यामुळे मंडळाने एकात्मता सायकल रॅलीचे आयोजन करून मंडळाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम केला आहे,अशा शब्दात सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. त्यानंतर संबंधित सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. ही रॅली बनशंकरी देवी मंदिर पासून ते शेळगी ब्रिज, सर्विस रोड,मार्केट यार्ड, पुन्हा सर्विस रोड, ठाणे बनशंकरी देवी मंदिर या मार्गे आयोजित करण्यात आली होती.या रॅलीस तब्बल 300 हून अधिक सायकल स्वरांनी सहभाग नोंदविला हे विशेष.रॅली पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागी सायकल स्वारांना मान्यवारांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
यश डेव्हलपर्सचे प्रमुख सुयश खानापुरे यांचेही विशेष योगदान लाभले.या रॅलीचे सूत्रसंचालन मंडळाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वेदपाठक यांनी तर आभार संस्कृतिक प्रमुख अक्षय कोरडे यांनी व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी उत्सव समिती चे उपाध्यक्ष रविराज कुदरे,संस्थापक अध्यक्ष बसवराज यलशेट्टी, संस्थापक सचिव महेश होटकर, सचिन सनकळ्ळी यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यानी अथक परिश्रम घेतले.