Wednesday, March 11, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भारतात प्रथमच सोलापुरात होणार मराठीतून छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा

MH13 News by MH13 News
1 year ago
in Blog, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
5
0
SHARES
68
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज मराठीतून करणार उदबोधन

सोलापूर : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सात दिवसीय कथेचे मराठीतून आयोजन समस्त हिंदू समाजातर्फे भारतात प्रथमच सोलापुरात होत आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० दरम्यान जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.



समस्त हिंदू समाज सोलापूरतर्फे ही विशेष पर्वणी शिवभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेकडो वर्षे  अत्याचाराने ग्रासलेला आणि गुलामगिरीत अडकलेला हिंदू समाज छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मुक्त केला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महती आजवर अनेक व्याख्याने, नाटक, चित्रपट, पोवाडे अशा अनेक माध्यमांतून गायली गेली आहे. मात्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या महान कार्याची माहिती कथा रूपाने मराठी भाषेत सांगण्याची ही पहिलीच वेळ आहे. प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून ही कथा मराठीतून ऐकण्याची सुवर्णसंधी सोलापूरकरांसह महाराष्ट्रातील शिवभक्तांना मिळणार आहे. छत्रपती श्री शिवरायांचा जन्म, शिव संस्कार, शिवप्रताप, शिवधैर्य, शिवशौर्य, शिवचातुर्य आणि शिवविजय या सात विषयांवर सात दिवस श्री शिवचरित्रातील विविध प्रसंग प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आपल्या ओघवत्या शैलीतून शिवभक्तांसमोर मांडणार आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यासह सर्व शिवभक्तांनी या कथेस दररोज उपस्थित राहून श्री शिवचरित्र कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी केले.

या पत्रकार परिषदेस सी. ए. राजगोपाल मिणीयार, हेमंत पिंगळे, संगीता जाधव, सतिश सिरसिल्ला, आकाश शिरते आदी उपस्थित होते.
———-
गुरुवारी निघणार शोभायात्रा

छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या निमित्ताने पहिल्या दिवशी गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता समस्त हिंदू समाजातर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून ही शोभायात्रा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौकमार्गे जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे विसर्जित होणार आहे. या शोभायात्रेत शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना, महिला मंडळे आपल्या कला पथकांसह सहभागी होणार आहेत. शोभायात्रा कथेच्या ठिकाणी आल्यानंतर प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज शिवभक्तांना पहिला भाग सांगणार आहेत. सोलापूरकरांनी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हेमंत पिंगळे यांनी याप्रसंगी केले.

Tags: Chattrapti Shivaji Maharajkatha
Previous Post

वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे बुधवारी सोलापुरात आगमन

Next Post

१ जून ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
१ जून ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस

१ जून ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.