Thursday, February 26, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कोरवली गावाला दोघा भावांकडून टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा…

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
कोरवली गावाला दोघा भावांकडून टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा…
0
SHARES
25
VIEWS
ShareShareShare

कोरवली ग्रामस्थांसाठी वाळे कुटुंबीय आले धावून

MH 13 NEWS NETWORK

मोहोळ तालुक्यातील ग्रामस्थांची भागवली तहान

स्वतःचा सहा एकर ऊस जळू दिला मात्र गावकऱ्यांचे पाणी बंद होवू दिले नाही…

पाणीटंचाईचा सामना करणार कोरवली ग्रामस्थांना मदतीचा हात देण्यासाठी वाळे कुटुंबीय पुढे आले आहे.वाळे कुटुंबीयांच्या वतीने मोफत टँकरद्वारे गावाची तहान भागवली जात आहे.

मोहोळ तालुक्यातील अनेक गावात दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे पाणीटंचाईची खूपच समस्या निर्माण झाल्याने गावातील नागरिकांना व महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत होते.

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेल व विहीर कोरडी पडल्याने गावात पाणी समस्या निर्माण झाली होती.पाण्यासाठी गावातील नागरिकांना व महिलांना पहाटेपासूनच रांग लावावी लागत होती.गावातील नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागत होते.मिळेल तेथून पाणी आणून गावकऱ्यांना तहान भागवावी लागत होती.हीच गैरसोय लक्षात घेऊन गावातील पाणीटंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न म्हणून ग्रामपंचायत सदस्य महासिद्ध वाळे व त्यांचे बंधू धनंजय वाळे या बंधूंनी कै.अमोगसिद्ध वाळे व कै.श्रीशैल वाळे यांच्या स्मरणार्थ स्वतःच्या बोरवेल व विहिरीतून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा गावात सुरू केला आहे.

यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा आहे.साधारणतः पाच हजार लोकसंख्या असलेल्या कोरवली पाणीपुरवठा करणारी विहीर बोअरवेल कोरडी पडल्याने सध्या पाणीपुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही.अशा परिस्थितीत वाळे कुटुंबीयाने सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतःचे सहा एकर ऊस क्षेत्र सोडून सामाजिक बांधिलकी जोपासत सहा एकर ऊसशेतीचे पाणी बंद करून गावाची तहान भागवण्यासाठी मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

अशा प्रकारे आजच्या दुष्काळी परिस्थितीत गावाला जलदूत म्हणून धावून आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यात गावातील तरुण तानाजी डिगे आणि आमोगसिद्ध कोळी हे मोफत ट्रॅक्टर चालवून त्यांना सहकार्य करत आहेत.

Previous Post

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Related Posts

महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.