सोलापूर / प्रतिनिधी
शहरातील विनायक नगर, एमआयडीसी येथील रहिवासी गौस इसाक पठाण (वय ४३) याच्यावर दोन वर्षांसाठी तडीपारीची (हद्दपारीची) कारवाई करण्यात आली आहे.गेल्या काही वर्षांत त्याच्यावर सामान्य नागरिकांना मारहाण करणे, महिलांवरील अत्याचार यांसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. सततच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पोलिसांच्या रडारवर आलेल्या पठाणविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१)(अ) नुसार कारवाई करण्यात आली आहे.

विजय कबाडे पोलिस उपायुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी हा तडीपारीचा आदेश दिला.
या आदेशानुसार, गौस पठाण यास सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून त्याला या कालावधीत कर्नाटकातील विजापूर येथे ठेवण्यात आले आहे.पोलीस प्रशासनाने सांगितले की, हा आदेश तातडीने अंमलात आणण्यात आला असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल.