Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

विकास हवा असेल तर पिंपरी-चिंचवड मॉडेल; सोलापुरात राष्ट्रवादीला संधी द्या” – खासदार सुनील तटकरे

mh13news.com by mh13news.com
2 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
विकास हवा असेल तर पिंपरी-चिंचवड मॉडेल; सोलापुरात राष्ट्रवादीला संधी द्या” – खासदार सुनील तटकरे
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

पायाभूत सुविधा, उद्योग, नागरी सेवा आणि नियोजनबद्ध विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने झालेला विकास हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले. मात्र सोलापूरला अद्याप असा सर्वांगीण विकास का मिळाला नाही, असा सवाल उपस्थित करत आता सोलापूरच्या नव्या विकासाची सुरुवात करण्याची वेळ आली असून पिंपरी-चिंचवडचे विकास मॉडेल सोलापुरात राबविण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

गांधी नगर येथील हेरिटेज येथे शुक्रवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी कृषीमंत्री व पक्षाचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री, प्रा. श्रीनिवास कोंडी, नजीब शेख, प्रमोद भोसले, आनंद मुस्तारे, मकबूल मोहोळकर, वसीम बुर्‍हाण, तौफिक शेख, चंद्रकांत दायमा, सुहास कदम, सुशील बंदपट्टे, चित्रा कदम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन खासदार सुनील तटकरे व मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक केले तर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागत केले.

तटकरे पुढे म्हणाले की, सोलापूर शहरातील बंद पडलेली सिटीबस सेवा, प्रवासी सुविधा, तसेच रखडलेली रिंग रोडसारखी महत्त्वाची विकासकामे पूर्ण करायची असतील तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हाच एकमेव विश्वासार्ह पर्याय आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात सोलापूरच्या विकासाचे नवे मॉडेल मांडण्यात आले असून पुढील पाच वर्षांत त्यातील सर्व मुद्दे पूर्ण करण्याची ग्वाही पक्षाने दिली आहे.

महायुती सरकारला साथ देण्याचा निर्णय हा केवळ राज्य आणि जनतेच्या विकासासाठीच घेतल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर सरकारने राबवलेल्या विविध योजनांमुळे विधानसभेला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला. सोलापूर शहर हे अजितदादांवर प्रेम करणारे असून ते विश्वासार्ह, कार्यक्षम आणि परिणामकारक नेतृत्व असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या मेळाव्यात मंत्री दत्तात्रय भरणे व रुपाली चाकणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे खासदार तटकरे यांनी स्वागत केले. आभार प्रदर्शन आनंद मुस्तारे यांनी केले.

Solapur Municipal Corporation, Solapur

Ajit Pawar

NCPSpeaks_Official

Previous Post

“१८ लाख लोकांपर्यंत स्मरणिका वितरणाचा उपक्रम”

Next Post

“ब्रेकिंग: मुख्यमंत्री फडणवीसांची सभा सोलापूर निवडणुकीचा गेमचेंजर!” – जयकुमार गोरे

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
“ब्रेकिंग:  मुख्यमंत्री फडणवीसांची सभा सोलापूर निवडणुकीचा गेमचेंजर!” – जयकुमार गोरे

“ब्रेकिंग: मुख्यमंत्री फडणवीसांची सभा सोलापूर निवडणुकीचा गेमचेंजर!” – जयकुमार गोरे

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.