Thursday, January 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

उच्च शिक्षणासह विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटीबद्ध

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
उच्च शिक्षणासह विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटीबद्ध
0
SHARES
10
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

पालकमंत्री चंद्रकांत पाटील : अनुसुयाबाई बुर्ला महाविद्यालयात कृतज्ञता मेळावा उत्साहात

सोलापूर : प्रतिनिधी

मोफत उच्च शिक्षण देण्याबरोबरच मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राज्यातील सर्व संवर्गातील मुलींचे उच्च शिक्षण महाराष्ट्र सरकारने मोफत केल्याबद्दल अनुसुयाबाई बुर्ला महाविद्यालयात शनिवारी आयोजित कृतज्ञता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, उपाध्यक्ष सचिन हिरेमठ, सचिव योगेश डांगरे, खजिनदार राहुल डांगरे, आई प्रतिष्ठानचे संचालक वसंत जाधव, सृष्टी डांगरे, शहाजी पवार, पांडुरंग दिड्डी, प्राचार्य तुकाराम शिंदे,

…… आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्व संवर्गातील मुलींचे उच्च शिक्षण महाराष्ट्र सरकारने मोफत केल्याबद्दल विद्यार्थिनींच्यावतीने पद्मशाली शिक्षण संस्थेतर्फे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यार्थिनींच्या उत्कर्षासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जर्मनी, जपान अशा अनेक राष्ट्रांमध्ये भारतातील कुशल युवकांना प्रचंड मोठी मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थिनींनीही कौशल्य आधारित शिक्षण घेऊन स्वविकास करणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता लागेल ती मदत देण्यास आई प्रतिष्ठान तयार आहे. राज्यातील मुलींकरिता तब्बल विविध ६४२ अभ्यासक्रम मोफत करण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थिनींनी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश शुल्क भरले आहे, अशा विद्यार्थिनींचे प्रवेश शुल्क सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात अर्ज केल्यानंतर परत मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी केले. प्रा. अभिज भानप यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य डॉ. तुकाराम शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास दादाराव चव्हाण, प्रताप महावरकर, शुभम चिट्ट्याल, विवेक नक्का, अविनाश शंकू, उमेश चिट्ट्याल, लक्ष्मीकांत येलदी, मल्लिकार्जुन येमुल, व्यंकटेश बंडा, अंबादास पोगुल, संस्थेच्या सहसचिवा संगीता इंदापूरे, खजिनदार नागनाथ गंजी, शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्याल, पांडूरंग दिड्डी, व्यंकटेश आकेन, मल्लिकार्जुन सरगम, विजयकुमार गुल्लापल्ली, हरिष कोंडा, गणेश गुज्जा, प्रभाकर आरकाल, नागनाथ श्रीरामदास, रमेश बोद्धूल, नरसय्या इप्पाकायल आदी उपस्थित होते.

चौकट

अन् दुसऱ्याच मिनिटाला पालकमंत्र्यांनी मान्य केल्या मागण्या

पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी मनोगतादरम्यान काही मागण्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या. विद्यार्थिनींच्या शिक्षणाबाबतच्या मागण्या पाहून पालकमंत्र्यांनी महाविद्यालयाला हॉल बांधण्यासाठी निधी, महाविद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे भरणे, रस्ता तयार करणे, हद्दवाढ भागापर्यंत बसचा मार्ग वाढवणे अशा अनेक मागण्या दुसऱ्याच मिनिटाला त्वरीत मान्य केल्या. पालकमंत्र्यांची ही तत्परता पाहून विद्यार्थिनींनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत त्यांचे आभार मानले.

Previous Post

श्री स्वामीसमर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

Solapur: भटक्या विमुक्तांच्या घरकुलांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

Related Posts

श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीमध्ये गणेश जयंती भक्तिभावात साजरी..
राजकीय

श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीमध्ये गणेश जयंती भक्तिभावात साजरी..

22 January 2026
महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

20 January 2026
‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!
राजकीय

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!

20 January 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
महाराष्ट्र

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

13 January 2026
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद
धार्मिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

13 January 2026
Next Post
Solapur: भटक्या विमुक्तांच्या घरकुलांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

Solapur: भटक्या विमुक्तांच्या घरकुलांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.