Thursday, October 30, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राज्यपाल मंगळवारी सोलापुरात ; असा आहे दौरा..

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
राज्यपाल मंगळवारी सोलापुरात ; असा आहे दौरा..
0
SHARES
921
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

राज्यपाल यांचा दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा…सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर, दिनांक 14 महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन हे दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार, प्रतिष्ठित व्यक्ती, आजी-माजी खासदार व आमदार, जिल्ह्यातील सर्व अधिकारी, राजकीय नेते, राजकीय पक्ष, जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी यांच्याशी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे ते संवाद साधणार आहेत.

हा दौरा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित माननीय राज्यपाल दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, पोलीस उपयुक्त दिपाली काळे, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, यांत्रिकी विभाग कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी दोन या कालावधीत सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, अन्न औषध विभाग, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, महापालिका, जिल्हा परिषद, माहिती विभाग या सर्व विभागांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. सर्व संबंधित नोडल अधिकारी व कॅम्प अधिकारी यांनी परस्परात समन्वय ठेवून दौरा यशस्वी करावा. नियोजनात कुठेही हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियुक्ती केलेले नोडल अधिकारी व कॅम्प अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे वाचन केले व सदरची जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडावी असे त्यांनी सांगितले. तसेच माननीय राज्यपाल दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे येतील.

त्यानंतर सकाळी 11:15 ते 12:50 या कालावधीत जिल्ह्यातील अधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार, राजकीय पक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, लॉयर्स असोसिएशन, चार्टर्ड अकाउंटंट, जिल्ह्यातील उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर व्यक्ती, एनजीओ, पत्रकार व अन्य यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी ते सोलापूरहुन पुढील कार्यक्रमासाठी जाणार आहेत. तरी या कालावधीत सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत दक्ष रहावे, असेही श्रीमती कुंभार यांनी सुचित केले.

Tags: Collector office solapurkumar ashirwadsolapurSolapur Maharashtraमहाराष्ट्र शासनराज्यपाल
Previous Post

शहर ‘उत्तर’मध्ये विधानसभेसाठी राहुल काटकर यांची मोर्चेबांधणी ; फडणवीस यांच्याकडे उमेदवारीची मागणी

Next Post

काम बोलता हैं.! देशमुख यांना उपमुख्यमंत्र्यांची साथ ; कामगारांना मिळणार हक्काची घरे..!

Related Posts

भाजप प्रवेशाच्या आदल्या दिवशीच राजीनामा.! माजी आमदार राजन पाटलांची ‘क्लीन एक्झिट’..
महाराष्ट्र

भाजप प्रवेशाच्या आदल्या दिवशीच राजीनामा.! माजी आमदार राजन पाटलांची ‘क्लीन एक्झिट’..

29 October 2025
कुर्मदास साखर कारखाना सज्ज ; ऊसदर आणि बोनसची गोड बातमी.!
कृषी

कुर्मदास साखर कारखाना सज्ज ; ऊसदर आणि बोनसची गोड बातमी.!

28 October 2025
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

पत्नीच्या खून प्रकरणी जन्मठेप ; पतीस उच्च न्यायालयाचा दिलासा..

28 October 2025
६८ लिंगांच्या विकासासाठी ‘देवाभाऊं’चा पुढाकार  ; शहर मध्यवर विशेष ‘मर्जी’…वाचा..!!
धार्मिक

६८ लिंगांच्या विकासासाठी ‘देवाभाऊं’चा पुढाकार ; शहर मध्यवर विशेष ‘मर्जी’…वाचा..!!

28 October 2025
‘भाजप’चा अंतर्गत वाद ‘प्रदेश’भाजप दरबारी..! दक्षिणेतले पदाधिकारी थेट मुंबई नगरीत..
राजकीय

‘भाजप’चा अंतर्गत वाद ‘प्रदेश’भाजप दरबारी..! दक्षिणेतले पदाधिकारी थेट मुंबई नगरीत..

28 October 2025
मोठी ब्रेकिंग | ओ मेंबर..! महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर!
सामाजिक

मोठी ब्रेकिंग | ओ मेंबर..! महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर!

27 October 2025
Next Post
काम बोलता हैं.! देशमुख यांना उपमुख्यमंत्र्यांची साथ ; कामगारांना मिळणार हक्काची घरे..!

काम बोलता हैं.! देशमुख यांना उपमुख्यमंत्र्यांची साथ ; कामगारांना मिळणार हक्काची घरे..!

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.