Monday, February 23, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महत्वाकांक्षी योजनांच्या प्रचाररथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
महत्वाकांक्षी योजनांच्या प्रचाररथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

चंद्रपूर : राज्य शासनाने शेतकरी, महिला, युवक-युवती, सर्वसामान्य नागरिक, वृद्ध नागरिक व इतरांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती जनतेला माहित व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांचा प्रचाररथ जिल्ह्यात फिरविण्यात येत आहे. या प्रचाररथाला राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

नियोजन सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना जसे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजना, अन्नपूर्णा योजना आदी योजनांची  प्रचार प्रसिध्दी या चित्ररथाद्वारे करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : राज्य शासनाची अतिशय महत्वकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लक्ष 84 हजार 857 अर्ज प्राप्त झाले. यापैकी तपासणी पूर्ण झालेल्या अर्जांची संख्या 2 लक्ष 81 हजार 588 आहे. ही टक्केवारी 98.85 आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सर्व लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे 3000 रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 59,765 शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे. सध्या राज्यात कृषीपंपांना रात्री 8 तास किंवा दिवसा 8 तास चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीज पुरवली जाते. आता शासनाने 7.5 एच.पी. पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत बीज देण्याचे ठरविले आहे. या योजनेचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील 59765 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना : राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी  आवश्यक साहित्य / उपकरणे खरेदी करणे, तसेच वृध्दांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे.

Previous Post

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ तारखेला जमा होणार

Related Posts

महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ तारखेला जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ तारखेला जमा होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.