MH13NEWS Network
दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी सोनाई फाउंडेशन व आधार हॉस्पिटल पुढे सरसावले आहेत. सिंदखेड, मंद्रूप व वांगी गावच्या विस्थापितांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.

पूरस्थितीचा धोका ओळखून प्रशासनाने सिंदखेडमधील नागरिकांना आहेरवाडी येथील कोनापुरे शाळेत हलवले. याच ठिकाणी शिबिर घेऊन विस्थापितांची तपासणी व मोफत औषधवाटप झाले.

दरम्यान,वांगी गावात घरोघरी आरोग्य तपासणी करून गरजूंना औषधे पोचवण्यात आली.पूरामुळे रोगराईचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हे शिबिर घेण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.

गावकऱ्यांनी हा उपक्रम पूरग्रस्तांसाठी दिलासा देणारा ठरल्याचे सांगत सोनाई फाउंडेशन व आधार हॉस्पिटलचे आभार मानले.
