Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

नागपूर येथे मुसळधार पाऊस; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
नागपूर येथे मुसळधार पाऊस; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

नागपूर : नागपूर शहर आणि जिल्ह्यात आज दि. 20 जुलै रोजी सकाळी मुसळधार पावसामुळे वाहतूक व जनजीवन विस्कळित झाले.  दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने सखल भागातील तुंबलेल्या पाण्याचा निचरा झाल्याने जनजीवन व वाहतूक पूर्वपदावर आली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा जोर लक्षात घेता तत्काळ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आढावा घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेतील मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आज सकाळी साधारणतः सहा वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले.  जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर हे स्वत: विविध सखल भागात जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. महानगरपालिका तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी अडचणीत असलेल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली. पावसामुळे सकाळी विस्कळीत झालेली वाहतूक दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्वपदावर आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शहरातील अनेक भागांना भेटी देऊन पाहणी केली.

नागपूर ग्रामीण भागात पावसाचे पाणी वस्तीमध्ये घुसल्याने अनेक ठिकाणी लोक अडकून पडले होते. कामठी तालुक्यामध्ये खेडी येथे 15 व्यक्ती, पावनगाव येथे 12 व्यक्ती, महलगाव येथे 10 व्यक्ती हे त्यांच्या राहत्या घराच्या परिसराला पाण्याने वेढा पडल्यामुळे अडकले होते. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हिंगणा तालुक्यात वाघधरा येथे 5 व्यक्ती वेणा नदीच्या पुरात अडकली होती. एसडीआरएफ मार्फत या व्यक्तींना सुखरुप स्थळी हलविण्यात आले. कुही तालुक्यात 21 घरांची, भिवापूरमध्ये 16 घरांची तर मौदामध्ये 10 घरांची पडझड झाली. याठिकाणी महसूल विभागाची टीम प्रत्यक्ष स्थळावर जाऊन आली असून पंचनामे व इतर प्रक्रिया पूर्ण करीत आहे.

Previous Post

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.