Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रूपये खात्यावर जमा, मला लय भारी वाटतंय!

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रूपये खात्यावर जमा, मला लय भारी वाटतंय!
0
SHARES
61
VIEWS
ShareShareShare

लाभार्थी सरिता कांबळे बहिणीची प्रतिक्रिया

जिल्ह्यातील सरिता कांबळे ठरल्या पहिला लाभार्थी

कोल्हापूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया आज स्वातंत्र्य दिनी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील पात्र महिलांना 2 महिन्यांची रक्कम 3 हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली असून उर्वरित पात्र महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरित होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोल्हापूर येथून या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी एकनाथ कांळबांडे, महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे आदी अधिकारी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्था व अंगणवाडी सेवीका, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी सरिता कांबळे यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून त्यांचे आभार मानले. श्रीमती कांबळे यांनी आनंद व्यक्त करताना रक्षाबंधनाची भेट मला 3 दिवस आधीच मिळाली असे मत व्यक्त केले. महिलांचा सन्मान केल्याबद्दल आभार मानून कोल्हापूरी भाषेत ‘मला लयं भारी वाटतंय!…’ अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. अंगणवाडी सेवीकेनी मला नारी शक्ती दूत ॲप द्वारे माहिती भरण्यास मदत केली असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अनुराधा कुमठेकर यांनी मला व कुटुंबियांसाठी आर्थिक लाभ होणार असल्याने शासनाचे आभार मानले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून मिळणाऱ्या अनुभवाचा भविष्यात निश्चित फायदा होणार

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागात प्रशिक्षणासाठी रुजू झालेल्या मृणाली कांबळे यांनी प्रशिक्षण घेवून मला नोकरीसाठी मदत होईल.  यातून मला प्रमाणपत्र मिळणार तर आहेच शिवाय सरकारी योजनेची माहितीही मिळणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना तसेच महिला व बाल विकास विभागाअतंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मिळाली या अनुभवाचा भविष्यात फायदाही होणार असल्याने शासनाचे तिने आभार मानले. यावेळी उपस्थित इतर लाभार्थी यांनी मिळालेल्या लाभाबद्दल शासनाचे आभार मानले.

Previous Post

याराना : ‘युवराजां’ना ‘सोमनाथां’ची साथ ; जिल्ह्यातील बिग दहीहंडी उत्सव ‘दक्षिण ‘ मध्ये..

Next Post

एकही नागरिक व शेतकरी आपत्तीच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही 

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
Next Post
एकही नागरिक व शेतकरी आपत्तीच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही 

एकही नागरिक व शेतकरी आपत्तीच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.