Sunday, April 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कायापालट करायचा असेल तर धनुष्यबाणालाच मत द्या – शिवसेनेचे आवाहन

mh13news.com by mh13news.com
3 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
कायापालट करायचा असेल तर धनुष्यबाणालाच मत द्या – शिवसेनेचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज अमरावतीमध्ये जाहीर सभेत #शिवसेना पक्षाच्या प्रचाराचे रणशिंग फुंकताना केले.

मालमत्तेच्या आकड्यांपेक्षा माणसांची नाती आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले. महिला भगिनींसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा तुमच्या भावाचा शब्द आहे असेही यावेळी निक्षून सांगितले.

अमरावती शहरात पाणीटंचाई, खराब रस्ते, कचरा व्यवस्थापन, लटकलेल्या वीजतारा, स्ट्रीट लाईट, गटार व्यवस्था, उद्याने, मैदाने, स्टेडियम, रुग्णालये असे मूलभूत प्रश्न आजही कायम आहेत. नगरविकास विभागाचे मंत्री म्हणून कचरा प्रश्नावर मार्ग काढणारच, अंडरग्राउंड वीजवाहिन्यांचे जाळे उभारणार, तसेच पिण्याचे शुद्ध पाणी आणि चांगले रस्ते उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

अमरावती महापालिकेला उद्यान विकासाकरिता १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भविष्यात आणखी तरतूद केली जाईल. रस्ते आणि पाणीपुरवठा योजनांसाठी नगरविकास विभागामार्फत निधी मंजूर झाला असून लवकरच तो उपलब्ध करून देऊ असेही याप्रसंगी स्पष्ट केले.

अमरावतीचा कायापालट करायचा असेल, विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. अमरावतीच्या भविष्याचा फैसला करणे आपल्या हातात असून येत्या १५ तारखेला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन अमरावतीकर नागरिकांना केले.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता, जलसंधारण मंत्री संजय राठोड, ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार संजय रायमुलकर, प्रियांका विश्वकर्मा, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने अमरावतीकर नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

Previous Post

संस्कृती जपत युवकांनी विकसित भारतासाठी योगदान द्यावे

Next Post

पुणे-पिंपरीतील नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादीचा ‘एक अलार्म, पाच काम’ कॅम्पेन

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
पुणे-पिंपरीतील नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादीचा ‘एक अलार्म, पाच काम’ कॅम्पेन

पुणे-पिंपरीतील नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादीचा ‘एक अलार्म, पाच काम’ कॅम्पेन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.