MH 13 News network
सोलापूर :सोलापूर–बार्शी महामार्गावरील बाळे कॉर्नर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांचे हाल होत होते. पावसाचे पाणी साचल्यामुळे अपघातांचाही धोका निर्माण झाला होता. या संदर्भात एमएच 13 न्यूजने ठळकपणे बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अखेर संबंधित विभाग हलला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका आणि महामार्ग अधिकाऱ्यांकडे या भागातील युवा नेते आनंद भवर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

सोलापूर बार्शी महामार्ग यावर अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे. स्थानिक नागरिक, वाहनधारक यामुळे प्रचंड त्रस्त झालेले आहेत.

याआधीही रस्त्यांच्या कामासाठी भवर यांनी सातत्याने संबंधित विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे. श्री. आनंद भवर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत सातत्याने पाठपुरावा केला.

अखेर आज सोमवारी पावसाने उघडीप दिल्यानंतर महामार्ग विभागाने तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्तीला सुरुवात केली. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष झाल्यानंतर महामार्ग विभागाने पुढाकार घेऊन प्रत्यक्ष दुरुस्ती कामास सुरुवात केली आहे.राहिलेले काम उद्या पूर्ण केले जाईल,” अशी माहिती आनंद भवर यांनी दिली.