Tuesday, April 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आदिवासी विकास महामंडळ मर्यादित वसतिगृह इमारतीचे उद्घाटन संपन्न

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
आदिवासी विकास महामंडळ मर्यादित वसतिगृह इमारतीचे उद्घाटन संपन्न
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

नाशिक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, वसतिगृह इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या प्रसंगी वसतिगृह इमारतीचे फित कापून उद्घाटन केले.

आज शहरातील सिडको भागात वसतिगृह इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होत्या, तर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील, एन.डी.गावित, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा आमदार सुनील भुसारा, धनराज महाले, भरतसिंग दुधनाग, मगन वळवी, विकास वळवी, विठ्ठल देखमुख,  मधुकर काठे, केवलराम काळे, अशोक मंगाम, प्रकाश दडमल, संचालिका ताराबाई माळेकर, जयश्री तळपे, मीनाक्षी वट्टी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी उभ्या केलेल्या वसतिगृहाच्या इमारतींचे काम कौतुकास्पद आहे. येथे वास्तव्यास येणाऱ्या  विद्यार्थ्यांनी  अध्ययनासोबतच  इमारतींचे सौंदर्य जतन केले पाहिजे. इमारतीच्या परिसरातील मोकळ्या जागेचा उपयोग हा पार्किंगसह  विद्यार्थ्यांसाठी एकत्रितपणे सांस्कृतिक कार्यक्रम घेता येईल या दृष्टीने करता येईल. वसतिगृहातील विद्यार्थी ते वसतीगृहाचा उद्घाटक हा प्रवास विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत यावेळी कथन केला.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती बनसोड म्हणाल्या की,  आज या वसतिगृहाचा अतिशय सुंदर प्रकल्प पूर्ण झाल्याचा आंनद होत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या वसतिगृह इमारतीत 100 ते 150 विद्यार्थ्यांची निवासाची सोय होणार आहे. येणाऱ्या काळातही महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या निवास व्यवस्था उभारल्या जातील असे त्यांनी योवळी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा आमदार सुनिल भुसारा व मधुकर काठे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वजन करण्यात आले. त्यांनतर वसतिगृह इमारतीचे कोनशीलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती शिरवाडकर यांनी केले, तर आभार प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी व्यक्त केले

Previous Post

बीड जिल्ह्याला बाल विवाह निर्मुलनासाठी ‘स्कॉच’ संस्थेचा पुरस्कार जाहीर

Next Post

शहरात नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
शहरात नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत

शहरात नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.