MH 13 News Network
भारताचा “कोहलीनूर” ! भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चारली धूळ
#mh13news
विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीमुळे भारताने पाकिस्तानला धूळ चारून विराट विजय मिळवला. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळाला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी केली जात आहे. भारतीयांचा मोठ्या प्रमाणावर सर्वत्र विजयी जल्लोष सुरू आहे. भारताच्या या विजयानंतर अक्षरशः दिवाळी सारखे वातावरण देशात निर्माण झाले.

आहे.चॅम्पियन ट्रॉफी मध्ये टीम इंडियाने शानदार विजय मिळवला आहे. 2025 ची चॅम्पियन ट्रॉफी दुबई मध्ये खेळली जात आहे.विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडून वनडेत सर्वात जास्त वेगवान शतक पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 50 शतक विराट कोहलीने पूर्ण केले आहेत. आजचे विजयी 51 वे शतक होते.
