१०० रिक्षाचालकांना अपघाती विमा
सोलापूर, दि. … – पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व यश डेव्हलपरचे मालक सुयश खानापुरे यांच्या संयुक्त विद्यमाने १०० रिक्षाचालकांना अपघाती विमा वाटप करण्यात आले.यावेळी श्रीची पालखी पूजा ट्रस्टी मंडळाचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी यांच्या हस्ते पार पडली. याप्रसंगी पांडुरंग काका दिड्डी, अजय दासरी, रामचंद्र जन्नू आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उपाध्यक्ष महांकाळ येलदी, सेक्रेटरी संतोष सोमा यांच्यासह डॉ. सूर्यप्रकाश कोटे, पत्रकार वेणुगोपाल गाडी, महेश हणमे, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, उमेश मामड्याल, शेखर जिल्हा, काशिनाथ गड्डम, श्रीनिवास म्याकल, पुरुषोत्तम पोबत्ती आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे प्रेसिडेंट विनोद केंजरला, अध्यक्ष लोकेश नंदाल, सेक्रेटरी विजय नीली, मिरवणूक प्रमुख राजदत्त गुंजाळ यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पूजा संपल्यानंतर ४० वारकरी भजनी मंडळाच्या भजनाने कन्ना चौक परिसर भक्तिमय झाला. त्यानंतर झालेल्या भरतनाट्यम सादरीकरणाने कार्यक्रमाला सांस्कृतिक रंग चढला.या प्रसंगी रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.