MH 13 NEWS NETWORK
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) प्रथम स्तरीय तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेची महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी केली.
सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी प्रक्रिया शुक्रवारी हुतात्मा स्मृती मंदिराच्या मागील बाजूस सुरू झाली. 2 जानेवारीपासून सुरू झालेली ही प्रक्रिया 4 जानेवारीपर्यंत चालणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह व त्रुटीरहित राहावी, या उद्देशाने मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय तपासणीची प्रक्रिया भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे राबविण्यात येत आहे.
ही प्रक्रिया ठराविक अनुक्रमानुसारच पूर्ण करणे बंधनकारक असून, कोणताही टप्पा अपूर्ण राहिल्यास संबंधित मतदान यंत्राचे प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण मानले जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
ईव्हीएम प्रथम सरीय तपासणी कार्यपद्धती अंतर्गत बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट तसेच मतदान यंत्रातील दिनांक व वेळ याची तपासणी टप्प्याटप्प्याने करण्यात आली. बॅलेट युनिट तपासणीदरम्यान पूर्वीच्या मतपत्रिका, स्टिकर व अॅड्रेस टॅग काढून टाकणे, रेडी लॅम्प, आरोव्ह व्होट लाईट, केबल, पिन्स व सर्व बटनांची कार्यक्षमता तपासण्यात आली. मेमरी व केबल जोडताना पिन खराब होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली.
कंट्रोल युनिट तपासणीमध्ये सी. यु. व बी. यु. एकमेकांना जोडून क्लियर, रिझल्ट, टोटल, बॅलेट, कॅन्डसेट आदी बटनांची कार्यक्षमता नियमानुसार तपासण्यात आली.
बॅलेट युनिट प्रत्यक्ष चाचणीदरम्यान उमेदवारांच्या समोरील दिवे, १ ते १६ बटनांची कार्यक्षमता तसेच इएनडी बटन वापरून मतदान प्रक्रिया पडताळण्यात आली.यानंतर ईव्हीएम मधील दिनांक व वेळ 24 तासांच्या फॉरमॅटमध्ये अचूकरीत्या सेट करण्यात आली. चुकीची नोंद झाल्यास दुरुस्तीची तरतूद वापरून अंतिम तारीख, वेळ निश्चित करण्यात आली.त्रुटी नोंदणी व मॉक पोल प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रियेदरम्यान आढळून आलेल्या तांत्रिक त्रुटींची कारणांसह स्वतंत्र नोंदणी करण्यात येत असून, दोषयुक्त मशीनची स्वतंत्र यादी तयार करण्यात येत आहे.राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थितीत प्रक्रियेच्या वेळी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. प्रतिनिधींना प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी प्रक्रिया सुरु असताना महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या तसेच कोणतीही तांत्रिक त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नियंत्रण अधिकारी तपन डंके,दीपक रजपूत,प्रकाश दिवानजी, शकील शेख,किशोर तळीखेडे यांच्यासह इसीआयएल, हैदराबाद या कंपनीतून दोन तज्ञ अधिकारी या चेकिंगकरीता संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
पारदर्शक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ ही मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, ईव्हीएम प्रथम तपासणी प्रक्रिया हा निवडणूक व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ४ जानेवारीपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिर पाठीमागे ही प्रक्रिया सकाळी दहा वाजल्यापासून चालू असणार आहे.








