MH 13 News Network
जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा
सोलापूर, दिनांक
6 जानेवारी हा दिवस राज्य मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सन 1832 मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले.
या निमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, योगेश तुरेराव, अनिल शिराळकर, श्री शैल चिंचोळीकर, विश्वनाथ व्हनकोरे, कर्मचारी शरद नलवडे, संजय घोडके, भाऊसाहेब चोरमले, प्रविण चव्हाण, पंकज बर्दापूरकर आदि उपस्थित होते.