MH13NEWS network
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादांच्या स्मृतींना अभिवादन करत “घड्याळाला मत म्हणजेच दादांना खरी श्रद्धांजली” असे भावनिक आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी नान्नज परिसरात प्रचाराची आक्रमक सुरुवात केली आहे. अनुभवी नेतृत्व, थेट संवाद आणि घराघरात पोहोचणारी शैली यामुळे प्रचार मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नान्नज जिल्हा परिषद गट क्रमांक 20 चे उमेदवार अनिल माळी आणि पंचायत समिती गण क्रमांक 40 चे उमेदवार प्रकाश चोरेकर यांच्या समर्थनार्थ काकांनी होम टू होम भेटी घेत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. विकासकामांचा आढावा, स्थानिक प्रश्न आणि दादांच्या कार्याच्या आठवणींमुळे वातावरण भावनिक झाले असून अनेकांनी खुलेपणाने पाठिंबा जाहीर केला.

शुक्रवारी रानमसले येथे माजी सरपंच नितीन (बापू) गरड यांच्या निवासस्थानी भेट देत काकांनी उमेदवारांना विजयी करण्यासाठी सहकार्याची विनंती केली. त्यावर नितीन बापू यांनी “फक्त मत नाही, माझ्या भागातून लीड देईन” असा शब्द देत ठाम पाठिंबा दर्शवला. या घोषणेमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला.
यावेळी उमेदवार प्रकाश चोरेकर, ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ हावळे, प्रकाश गरड, कुमार गरड, रानमसले गावचे उपसरपंच रमेश सुतार, माजी उपसरपंच बालाजी गरड, राजाभाऊ पाटील, तानाजी पाटील, रमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








