Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

करमाळा |भुईकोट किल्ल्यासाठी ‘ मामा ‘ ॲक्शन मोडवर..वाचा

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
76
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

करमाळ्याच्या भुईकोट किल्ल्याचे संवर्धन होणार
आ.संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्यासाठी २ कोटी निधी मंजूर
राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून या कामासाठी २ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.


याविषयी अधिक माहिती देताना आ. शिंदे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा या तालुक्यांबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम आदी भागावरती राजे रावरंभा निंबाळकर यांची सत्ता होती. करमाळ्यातील कमलादेवीचे मंदिर तसेच भुईकोट किल्ला हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे.

करमाळा हे तालुक्याचे ठिकाण असून त्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ऐतिहासिक वारसाचे जतन व संवर्धन करणे हे आपले काम आहे. त्यानुसार आपण करमाळा तालुक्यातील कमला भवानी मंदिराच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून ४ कोटी निधी मंजूर केला. त्याचप्रमाणे भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी २ कोटी निधी मंजूर केलेला आहे. सध्या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे या प्रकारच्या बांधकामाचा सामावेश आहे. किल्ल्याच्या कामासाठी निधीस मंजुरी मिळाली असल्याने लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल, तसेच या कामामुळे किल्ल्यास पुर्नवैभव लाभणार असून करमाळा शहाराच्या विकासात आणखीन भर पडण्यास मदत होणार आहे.


करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी आपण १०० कोटीपेक्षा अधिक निधी दिला – आ.शिंदे


करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडणेसाठी आत्तापर्यंत आपण करमाळा नगरपरिषद इमारत बांधकाम करणे ,सांस्कृतिक सभागृह बांधणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे या कामासाठी १० कोटी निधी, जिन मैदान येथील क्रीडा संकुल विकासासाठी ६ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील रस्ते विकास, दफनभूमी सुधारणा आदी कामांसाठी १० कोटी, करमाळा उपजिल्हा रुग्णालय बांधकामासाठी २५ कोटी ,उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी १८ कोटी, सहकारी संस्था निबंधक कार्यालयासाठी २ कोटी, करमाळा शहरातील प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील रस्ते विकासासाठी १ कोटी,निधी मंजूर केलेला आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले व त्याला यशही मिळाले आहे. करमाळा शहरातील सर्व प्रशासकीय इमारती एका ठिकाणी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीकरता २५ कोटी निधीची मागणी केलेली आहे.

आ. संजय शिंदे
Tags: babandada shinde karmalafortSanjay mama shinde
Previous Post

पत्रातालीम |अशोकाच्या उंच झाडावर अडकले मांजराचे पिल्लू..! पण

Next Post

कुणबी प्रमाणपत्र | माढ्याची जोरदार घोडदौड ; 38 गावात सापडल्या हजारो नोंदी..वाचा

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

कुणबी प्रमाणपत्र | माढ्याची जोरदार घोडदौड ; 38 गावात सापडल्या हजारो नोंदी..वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.