MH 13 NEWS NETWORK
काशिलिंग मंदिर, जेऊर | सोलापूर
सोलापूर जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा, धार्मिक स्थळे आणि समृद्ध संस्कृतीचा अनुभव देणाऱ्या पर्यटन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथील प्रसिद्ध काशिलिंग मंदिरास आमदार सुभाष देशमुख यांनी विशेष भेट दिली. त्यांनी मंदिरात दर्शन घेतले व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पर्यटन सप्ताहाचे आयोजन २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि स्थानिक पर्यटनाला चालना देणे हा आहे.

यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले की,
“सोलापूर जिल्हा हा केवळ शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर धार्मिक व सांस्कृतिक वारशानेही संपन्न आहे. अशा उपक्रमांद्वारे नव्या पिढीला आपल्या भूमीचा अभिमान वाटावा, हाच यामागचा हेतू आहे.”

या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये बाजार समितीचे संचालक श्री. अतुल गायकवाड, श्री. शिवानंद भरनशेट्टी, श्री. अविनाश कोणाळी, श्री. सोमनाथ चौलगी, माजी सरपंच श्री. महानंतेश पाटील, श्री. इराणना भरमाशेट्टी, सिद्दार्थ पाटील ट्रस्टचे मल्लिकार्जुन पाटील, श्री. इंरांना कनबसे, श्री. बसवराज स्वामी (पुजारी), श्री. रिजवान मुजावर, श्री. अब्दुल मुजावर आदींचा समावेश होता.
स्थानिक नागरिकांनीही आमदारांच्या भेटीचे स्वागत करत पर्यटन सप्ताहास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.