MH 13 News Network
किसन जाधव यांची अजित पवारांकडे आग्रही मागणी, सोलापूर शहर मध्य विधानसभा राष्ट्रवादीला द्या
शहर मध्य विधानसभा राष्ट्रवादीला देण्यासाठी अजित पवार सकारात्मक-किसन जाधव
सोलापूर -आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणून अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नियोजन करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांची भेट घेतली.
त्या भेटीदरम्यान किसन जाधव यांनी अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी करीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी लढवावी यासाठी ही जागा राष्ट्रवादीच्याच वाटेला घ्यावी अशी मागणी किसन जाधव यांनी अजित पवारांकडे केली.
सोलापूर शहरातील तीन पैकी एक जागा राष्ट्रवादीला सुटेल असा विश्वास राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व्यक्त करत आहेत याच पार्श्वभूमीवर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ ही राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट आणि चर्चा झाली यावर अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल असा विश्वास देखील या चर्चेदरम्यान किसन जाधव यांना अजित पवारांनी दिली.
दरम्यान ,यावेळी किसन जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीची संघटनात्मक पक्ष बांधणी करू, शहर मध्य विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवारांने निवडणूक लढवावी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवाराच्या विजयासाठी जोमाने कामाला लागतील असे देखील ते म्हणाले. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताची मित्रपरिवार आणि प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वतीनं अजितोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये शहर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोफत नोंदणी शिबीर, 22 जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत पाच हजार रुपये फिक्स डिपॉझिट, क्षयरोग बाधितांना सहा महिन्याचे अन्नधान्य किट यासह विविध विकास कामांचे शुभारंभ आदी कार्यक्रमांचा समावेश होता. यावेळी किसन जाधव यांनी अजितोत्सव चषक कबड्डी स्पर्धेचे सन्मान चिन्ह अजित पवार यांना देण्यात आले.
यावेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सह कोषाध्यक्ष संजय बोर्गे, नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे, माऊली जरग, महादेव राठोड यांच्यासह इच्छा भगवंताची मित्रपरिवारचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी अजित पवारांनी केली.