Saturday, April 11, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कुडलच्या मंदिरास धार्मिक पर्यटन क्षेत्र बनविणार – आ.सुभाष देशमुख

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, सामाजिक
0
0
SHARES
136
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

कुडलच्या मंदिरास धार्मिक पर्यटन क्षेत्र बनविणार – आ.सुभाष देशमुख

भीमा सीना नदीच्या कृतज्ञतेसाठी कुडल येथे संगम आरती

सोलापूर, दि. 8 मार्च –
आध्यात्मिक पर्यटनातून विकास शक्य आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल ये तिला हरिहरेश्वर आणि संगमेश्वर हे प्राचीन मंदिर असून, मंदिरास धार्मिक पर्यटन क्षेत्र बनविणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
महाशिवरात्रीनिमित्त हत्तरसंग कुडल (दक्षिण सोलापूर) येथे नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी दि.8 मार्च रोजी सायंकाळी संगम आरती आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते यांच्याहस्ते संगम आरती करण्यात आली.

हत्तरसंग कुडल संगम येथे संगम आरती करताना आमदार सुभाष देशमुख यांच्यासह मान्यवर


प्रारंभी दीपप्रज्वलन करून नदीला नैवेद्य अर्पण करण्यात आले.
दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. प्रारंभी संगमेश्वर मंदिरापासून ते संगम घाटापर्यंत संबळाच्या निनादात आरती आणण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सूर्यास्ताच्या वेळी काशीच्या धर्तीवर भीमा-सीना नद्यांच्या संगम घाटावर भक्तिमय वातावरणात संगम आरती करण्यात आली.
कृषी संस्कृतीचा विकास व्हावा, भीमा-सीना संगम नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह अखंड वाहत रहावा, नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगमेश्वर देवस्थान समिती आणि भक्त मंडळांच्या वतीने संगम आरती आयोजित करण्यात आली होती. यंदा आरतीचे पाचवे वर्ष आहे.
तत्पूर्वी पहाटेच्या सुमारास श्रींच्या मुर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर जगातील एकमेव दुर्मिळ अशा बहुमुखी शिवलिंगाचा अभिषेक करून, पूजा करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची पहाटे पाच वाजल्यापासूनच रांग लागली होती. बहुमुखी शिवलिंग, संगमेश्वरांचे शिवलिंग, पंचमुखी परमेश्वर शिवलिंगास बिल्वरचन पत्र अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
तसेच मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, हनुमान मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान समिती आणि आडत व्यापारी मल्लिकार्जुन बिराजदार यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. बिराजदार हे गेल्या 21 वर्षापासून हे महाप्रसाद व्यवस्था करत आहेत.
संगम आरतीस डॉ. चनगोंडा हविनाळे , पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वहाणे, निपाणी , मल्लिकार्जून बिराजदार , सिद्धाराम उमदी , हणमंत कुलकर्णी , मळसिद्ध मुगळे , आणप्पा बाराचारे, गुरण्णा तेली, कॉन्ट्रॅक्टर फड , संगप्पा केरके , आण्णाराव पाटील , मल्लप्पा पाटील , चन्नप्पा बगले , पंडीत पुजारी , निजामोद्दीन बिराजदार , शरणप्पा बिराजदार , देविन्द्रप्पा पाटील, संगप्‍पा केरके, आडत व्यापारी मल्लिनाथ बिराजदार हणमंत बगले उपस्थित होते.
सूत्रसंचालन हणमंत बगले, प्रास्ताविक संगप्‍पा केरके, .तर अण्णाराव पाटील यांनी आभार मानले.

Tags: Bhima Sinasolapur
Previous Post

‘त्या’ बोलेरोतून 1200 लिटर हातभट्टी दारू जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Next Post

मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील हे दोन आमदार सरसावले पुढे.! थेट मुख्यमंत्र्यांना..!

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post

मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील हे दोन आमदार सरसावले पुढे.! थेट मुख्यमंत्र्यांना..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.