MH 13 News Network
महादेव कोगनुरे यांचा विधानसभेचा उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाकडे सुपूर्द.
काँग्रेस व महादेव कोगनुरे समर्थकात उत्साह.
जोरदार शक्तिप्रदर्शन करीत विधानसभा उमेदवारी अर्ज पक्षाकडे सुपूर्द
लोकसभेच्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीच्या वतीने आता आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरवात केली आहे.
मागच्याच आठवड्यात एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांचे विश्वस्त अजित पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जाऊन महादेव कोगनुरे यांच्या करीता दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला होता.
आज इच्छुक उमेदवार म्हणून महादेव कोगनुरे यांचा विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज शहराध्यक्ष श्री. चेतन नरोटे यांच्याकडे सुपुर्द केल्याने कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.
आता काँग्रेसकडून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर महादेव कोगनुरे यांनी दावा केल्याने उत्सुकता वाढली आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. मागच्याच आठवड्यात महादेव कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यांनी श्री सिद्धारामेश्वर व रुपाभवानी मातेची विधीवत पुजा करुन व नतमस्तक होऊन महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून मंदिरात प्रार्थना केली होती.
समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी निरंतर करीत असलेल्या सामाजिक कामाच्या जोरावर मला जनतेतून उदंड पाठबळ मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून एम के फाउंडेशनच्या माध्यमातून करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेकांनी व शुभचिंतकांनी दक्षिण मधून नेतृत्व करण्याची विनंती केली होती, जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची जाण मला आहे. आगामी काळात अधिक वेगाने जनकल्याणासाठी आपण कार्यरत राहू. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर नक्कीच विश्वास दाखवतील व त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर मी पक्षाकडे उमेदवारीचा अर्ज दाखल केला असल्याचे मनोगत महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होणार, मला विधानसभा तिकीट मिळणार असा विश्वास महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केला .
सोलापूर काँग्रेस भवन येथे इच्छुक उमेदवार म्हणून महादेव कोगनुरे यांचा विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज आणि माहिती काँग्रेस पक्षाकडे सुपूर्द करताना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी.
याप्रसंगी शहराध्यक्ष श्री. चेतन नरोटे, तिरुपती परकिपंडला, हरीश पाटील, रमेश हसापुरे, प्रभाकर दिंडोरे, गुरुलिंग अचलेर, मल्लिनाथ धरसांगे, सरपंच बसवराज बगले, राधाकृष्ण पाटील, अशोक देसाई, मल्लेशी मंदोली, बसणा बाके, रविकांत पाटील, रविकांत चंदोडे, सुनील पारे, काशिम शेख, सरपंच धरमण्णा गावडे, सरपंच अमसिद्धा देशमुख, सोमनिंग देशमुख, सुरेश शर्मा, कल्लप्पा हांगर्गी, मल्लिनाथ धारसंगे, बसम्मा पाटील, सुनीता चव्हाण, मनोहर माचरला, शिवशरण मुलगे, सिद्धाराम बगले, चंद्रकांत देशट्टी, रेवणू कोणदे, किरण सुर्वे तसेच सरपंच उपसरपंच काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, शुभचिंतक, मान्यवर उपस्थित होते.