MH 13 News Network
महादेव कोगनुरे यांनी घेतली औज मंद्रूप येथील जळीतग्रस्त कुटुंबियांची भेट.
जळीतग्रस्त कुटुंबियांना दिला मदतीचा हात.
जळीतग्रस्तावर माणूसकी दाखवणारा महादेव सध्या चर्चेत
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप येथे आज शुक्रवार दि 2 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सिराज शेख यांच्या घरात शाॅक सर्किट होऊन अचानक आग लागून संपूर्ण घर जळून बेचिराख झाले होते. शेख यांच्या मदतीसाठी महादेव कोगनुरे देवासारखे धावत गेले आणि त्यांनी मदतीचा हात दिला अशी चर्चा परिसरात होत आहे.
सिराज शेख यांच्या घराला लागलेली आग गावातील तरुण वर्गाने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु या तरुणांच्या प्रयत्नाला यश आले नाही.शेवटी सिराज शेख यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले.या आगीत जवळपास लाख दीड लाख किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.
या अचानक लागलेल्या आगीमुळे सिराज शेख कुटुंबियांचे संसार सध्या उघड्यावर पडल्याची माहिती एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेस नेते महादेव कोगनुरे यांना मिळताच एम के फाऊंडेशन चे पदाधिकारी व खुद्द महादेव कोगनुरे यांनी जळीत घटनेची दखल घेत औज येथील जळीतग्रस्त सिराज शेख यांच्या घराला भेट देऊन मदतीचा हात देऊन धीर देत माणूसकी जपली आहे.
महादेव कोगनुरे हे नेहमीच जळीतग्रस्तांच्या मदतीला धावून येत असतात. याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा औजकरांना व सिराज शेख कुटुंबियांना आली आहे. सतर्कता दाखवत महादेव कोगनुरे यांनी आज सिराज शेख कुटुंबियांवर दाखवलेल्या माणुसकीचे सध्या सर्वत्र कौतुक होताना पहायला मिळत आहे.
यावेळी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले की,सध्या शेख कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी मदतीची व धीर देण्याची नितांत गरज आहे. जळीतग्रस्त कुटुंबियांची हीच गरज ओळखून मी या ठिकाणी आलो आहे.गेली अनेक वर्षे मी जळीतग्रस्तांचे दु:ख जवळून पाहिले आहे.म्हणूनच आज मी सिराज शेख कुटुंबियांना धीर देण्यासाठी याठिकाणी पोहचल्याचे सांगितले.
या वेळी पोलीस पाटील नागेश उंबरजे,सरपंच विकास केरके, तलाठी नींगु कोळे, कोतवाल भाऊसाहेब गायकवाड, निवृत्त शिक्षक कुंभार सर,इस्माईल शेख, बाबूलाल शेख, प्रथमेश गायकवाड, मल्लिकार्जुन करडे, विठ्ठल गायकवाड, आयुभ मकानदार, सुपुत्र कोरे, प्रथमेश कवडे, चंद्रकांत शेंडगे तसेच प्रतिष्ठित नागरिक व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.