Sunday, July 20, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

MH 13 News by MH 13 News
11 months ago
in महाराष्ट्र
0
महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

  • राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून ‘मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजने’तील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप
  • उदगीर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत सक्षमीकरण आनंद मेळावा संपन्न

उदगीर: राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. शासनाने आता महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावले उचलून त्यांच्या स्वावलंबन,  निर्णय शक्तीत वाढ केली आहे. महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सुरु असलेल्या आर्थिक विकासाच्या निर्णयाचे कौतुक केले.

उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे कौतुक करत महिला सक्षमीकरणाला राज्य शासन चालना देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. तर विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास आणि पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचीही उपस्थिती होती.

उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित महिलांशी संवाद साधायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनांसह महिलांच्या अन्य योजनांची माहिती घेतली. याशिवाय राज्यात लखपती दिदी योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादाचाही आढावा घेतला. या योजनांचे दृष्य परिणाम दिसत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक कुटुंबात उदरनिर्वाह चालविण्यासाठी महिलांची मुख्य भूमिका असते. त्यामुळे महिलांनी आता राजकीय क्षेत्रातही पुढे येत देशाचे नेतृत्व करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुरुषांनी आता महिलांच्या क्षमतेला ओळखून त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी पाठबळ द्यावे. तसेच आमच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान करणे पुरुषार्थ मानला जातो. प्रत्येक कुटुंबामध्ये हा सन्मान दिसून आला पाहिजे. महिलांनी सर्व आघाड्यांवर अग्रेसर राहताना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना सुरुच राहील – मुख्यमंत्री

राष्ट्रपतींच्या जीवनातील संघर्ष हा सर्वसामान्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच आज त्या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्या आहेत. या ठिकाणी उपस्थित महिलांना राष्ट्रपती महोदयांच्या यशाचे कौतुक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत राज्य शासनाने केंद्र शासनाच्या लखपती दिदी योजनेसह मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना, अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांमुळे शासन सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती पुढेही चालूच राहणार आहे. माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि माता भगिनींचा आशिर्वाद कायम राहिल्यास दीड हजाराची रक्क्कम वाढविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आर्थिक महासत्ता बनण्याकडे अग्रेसर असून, अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत कायम आघाडीचे राज्य राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सामान्य कुटुंबातील एक संघर्षशील महिला आपल्यापुढे राष्ट्रपती म्हणून विराजमान आहेत. तर मागास वर्गीयाचे प्रतिनिधीत्व नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे संविधान बदलाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

संविधान बदलू शकणार नाही – रामदास आठवले

राज्य, देशाच्या विकासासाठी आणि संविधान मजबूत करण्यासाठी सर्वजण प्रयत्नरत असून, कोणीही देशाचे संविधान बदलू शकत नसल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच राज्याची विकासाची गाडी पुढे नेताना महिलांना आर्थिक ताकद देत त्यांनाही विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

घटनारक्षण प्रथम कर्तव्य – देवेंद्र फडणवीस

जगातील सर्वात उत्तम संविधान हे भारताचे असून, ते कोणीही बदलू शकणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, केंद्र व राज्य शासन संविधानानुसारच काम करत आहे. केंद्र शासनाच्या नेतृत्वात राज्य शासनाने केंद्र शासनाकडून चैत्यभूमीची जागा परत घेतली आहे. तसेच लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर लिलावात विकत घेतले आहे. शिवाय जपानमधील कोयासन विद्यापिठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. या विकास प्रक्रियेत महिलांचाही तेवढाच महत्त्वपूर्ण सहभाग राहणार असल्यामुळे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला. या योजना बंद पडणार नाहीत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

सक्षमीकरणात महाराष्ट्र प्रथम – आदिती तटकरे

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात 1 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. लवकरच अडीच कोटीवर महिलांना लाभ मिळेल, असे महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांनी सांगितले.

अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेतून राज्यातील महिलांच्या विकासात मोठा बदल घडून येणार असून, महिलांच्या विकासात कोणतीही कसर राहणार नाही. महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. राज्यात बालकांच्या नावापुढे आईचे नाव लावणारे हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा व मेडिकल द्या – संजय बनसोडे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे म्हणाले, बुद्धाच्या शांततेच्या विचार मार्गावरूनच जगाला पुढे जावे लागणार आहे. उदगीरातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जातो. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतून पुरोगामी महाराष्ट्रात नवा प्रकाशमार्ग निर्माण केला आहे.

यावेळी त्यांनी उदगीर शहराच्या विकासकामांची उपस्थितांना माहिती दिली. उदगीरमध्ये जिल्ह्याची क्षमता असून, उदगीरची जिल्हा निर्मिती करावी तसेच येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी द्यावी, अशी मागणी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी केली.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते उदगीर येथे ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाचे विमोचन झाले आणि त्याची पहिली प्रत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना भेट देण्यात आली. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू आणि राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते महिलांना लाभवाटप करण्यात आले.

Previous Post

अहमदनगरमधील शेतकऱ्यांची डाळिंबे निघाली ऑस्ट्रेलियाला

Next Post

अल्पवयीन मुली आणि महिलांसंदर्भातील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेचा दयेचा अर्ज नाकारावा

Related Posts

जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकटीसाठी खा. तटकरे यांचा महाराष्ट्र दौरा; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
महाराष्ट्र

जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकटीसाठी खा. तटकरे यांचा महाराष्ट्र दौरा; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

20 July 2025
डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली : निलेश झालटे
महाराष्ट्र

डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली : निलेश झालटे

20 July 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

20 July 2025
‘रायगडवाडी’ एक ऐतिहासिक निर्णय : पालकमंत्री गोरे यांचा आमदार कोठे, धुत्तरगांवकर, सहकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
धार्मिक

‘रायगडवाडी’ एक ऐतिहासिक निर्णय : पालकमंत्री गोरे यांचा आमदार कोठे, धुत्तरगांवकर, सहकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

19 July 2025
सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!
आरोग्य

सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!

18 July 2025
पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली
गुन्हेगारी जगात

पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली

18 July 2025
Next Post
अल्पवयीन मुली आणि महिलांसंदर्भातील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेचा दयेचा अर्ज नाकारावा

अल्पवयीन मुली आणि महिलांसंदर्भातील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेचा दयेचा अर्ज नाकारावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.