Thursday, January 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

mh13news.com by mh13news.com
2 days ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणुकींचे १९ सामंजस्य करार

धरा लाख रोजगार संधी, आयटी, डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक

गतवर्षीच्या टप्पा ओलांडून, यंदा विक्रमी गुंतवणुकीचा विश्वास

दावोस, दि. २० : –  भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री श्री.फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही- ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहोचणार असल्याने, तेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणा रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधीमंडळ दावोस येथे उपस्थित आहे. दावोस मधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरु केले. यातून गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरु झाल्याने महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये उत्साहाचे चित्र निर्माण झाले.

तत्पूर्वी, दावोस मधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.’ भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे. भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योग विश्वाला साद घालत आहे, अशी  मनोदय भावनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

सामंजस्य करारांवरील स्वाक्षरी व करारांच्या आदान-प्रदान प्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणुकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

‘उद्योजक – गुंतवणूकदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, यंदा गतवर्षीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार संधीचे सामंजस्य करार होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विशेषतः मुंबईतील घन कचरा व्यवस्थापन, हवा आणि पाणी गुण संनियत्रणाच्या माध्यमातून सर्क्युलर ईकॉनॉमीची संरचना उभी केली जात आहे. तसेच महाराष्ट्र हे अमर्याद संधीचे राज्य आहे. त्याबाबत आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासासह, तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने आराखडा निश्चित करून दिला आहे. या माध्यमातून व्यवसायाच्या आणि चांगल्या पगाराच्या रोजगार निमिर्तीवर भर दिला जात असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, आगामी दोन दिवसात दावोसमध्ये एआय़, क्वांटम कंम्प्युटींग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, यांसह फिनटेक, लॉजिस्टिक्स अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच जहाज बांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशीही गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशी, बोलणी -चर्चांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) या गुंतवणूक आणि उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या समर्पित संस्थात्मक व्यवस्थेमुळे यंदा गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्राचा महाराष्ट्राकडील ओघ आणखी वाढला आहे.

सामंजस्य करार पुढीलप्रमाणे…

महाराष्ट्र सरकार-काल्सबर्ग

क्षेत्र: अन्न प्रक्रिया आणि कृषी

गुंतवणूक: ५०० कोटी

रोजगार : ७५०

महाराष्ट्र सरकार- योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि.

क्षेत्र: नविनिकरणीय ऊर्जा

गुंतवणूक: ४ हजार कोटी

रोजगार : ६ हजार

ठिकाण: पालघर/एमएमआर

महाराष्ट्र सरकार-बीएफएन फॉर्जिंग्स

क्षेत्र: स्टील

गुंतवणूक: ५६५ कोटी

रोजगार : ८४७

ठिकाण: पालघर/एमएमआर

एमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटी

गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स

रोजगार : ८० हजार.

एमएमआरडीए-के. रहेजा

गुंतवणूक: सुमारे १० बिलियन डॉलर्स

रोजगार : एक लाख.

एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशील

गुंतवणूक: सुमारे २५ बिलियन डॉलर्स

रोजगार : २ लाख ५० हजार.

एमएमआरडीए-एसबीजी समूह

क्षेत्र: लॉजिस्टिक्स

गुंतवणूक: सुमारे २० बिलियन डॉलर्स

रोजगार : ४ लाख ५० हजार.

एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबल

गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स

रोजगार : ८० हजार.

एमएमआरडीए-जायका

धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर

एमएमआरडीए-सेम्बकॉर्प डेवलपमेंट लि. सिंगापूर

एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर

एमएमआरडीए-टेक्निकल युनिव्हर्सिटी, मुनीच, जर्मनी

शाश्वत नागरी वाहतूक प्रणाली

महाराष्ट्र सरकार-सुरजागड इस्पात

क्षेत्र: स्टील

गुंतवणूक: २० हजार कोटी

रोजगार: ८ हजार.

ठिकाण: गडचिरोली

महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्स

क्षेत्र: आयटी, डेटा सेंटर्स

गुंतवणूक: १ लाख कोटी

रोजगार: १ लाख ५० हजार.

ज्यांनी महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणि विस्तार करण्याची तयारी दर्शवली असे: कोकाकोला, आयकिया, स्कोडा ऑटो.

याशिवाय, कार्लसबर्गचे सीईओ जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीला पोषक वातावरणाचे कौतुक करताना राज्याच्या उद्योग धोरणाला दाद दिली. कंपनी लवकरच भांडवली बाजारात आयपीओ आणण्यासाठी प्रय़त्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोका-कोला कंपनीचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट मायकेल गोल्टझमन यांच्या समेवत देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली.

Previous Post

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

Next Post

श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीमध्ये गणेश जयंती भक्तिभावात साजरी..

Related Posts

श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीमध्ये गणेश जयंती भक्तिभावात साजरी..
राजकीय

श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीमध्ये गणेश जयंती भक्तिभावात साजरी..

22 January 2026
‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!
राजकीय

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
महाराष्ट्र

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

13 January 2026
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद
धार्मिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

13 January 2026
Next Post
श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीमध्ये गणेश जयंती भक्तिभावात साजरी..

श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीमध्ये गणेश जयंती भक्तिभावात साजरी..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.