Friday, August 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कोल्हापुरातील महिला सन्मान सोहळा यशस्वी करा 

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
कोल्हापुरातील महिला सन्मान सोहळा यशस्वी करा 
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना

कोल्हापूर,: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी तपोवन मैदानावर होणारा महिला सन्मान सोहळा यशस्वी करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

तपोवन मैदानावर गुरुवारी दि. २२ रोजी होणारा सन्मान सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या महिला सन्मान सोहळ्याची नियोजन बैठक पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, लाभार्थी महिलांच्या सहभागातून होणारा हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्या चोख पार पाडाव्यात. कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या महिला लाभार्थ्यांची तालुकानिहाय यादी तयार करा. कार्यक्रमात उपस्थित लाभार्थ्यांना फूड पॅकेट, नाश्ता, पिण्याचे पाणी, फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था, साफसफाई, पार्किंग, वाहतूक व्यवस्था यांचे योग्य नियोजन करा.

यावेळी मान्यवरांची बैठक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय सुविधा, विद्युत पुरवठा, स्वच्छता, पोलीस बंदोबस्त यांचा आढावा त्यांनी घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमस्थळी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.

Previous Post

‘पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात

Next Post

दौंडमधील विकासासाठी सकारात्मक निर्णय घेणार

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
Next Post
दौंडमधील विकासासाठी सकारात्मक निर्णय घेणार

दौंडमधील विकासासाठी सकारात्मक निर्णय घेणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.