MH 13 news network
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरूच असून काल 24 फेब्रुवारी राज्यामध्ये रास्ता रोको आंदोलन घेण्यात आले होते. यावेळी आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया झाली, जरांगे पाटील यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत असून त्यांच्या जवळची माणसे फोडण्यात येत असल्याचा तसेच आंदोलनाची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला असून जर माझा बळी पाहिजे तर सागर बंगल्यावर येऊन देतो असे सांगून तातडीने जालना ते मुंबईच्या दिशेने पाटील आणि त्यांचे सहकारी निघाले आहेत.
आज अंतरवाली सराटी येथे त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे…
अंतरवाली बैठक 25 फेब्रुवारी 2024 अजित करण्यात आली होती…
मी कोणत्याही पक्षाचा नाही
सरकारने 10% आरक्षण दिले.
ठरलं होत ‘ सगेसोयरे ‘ कुणबी प्रमाणपत्र द्यायचं
आपल्या आरक्षणास देवेद्र फडणवीसचा विरोध आहे..!
शिंदे, अजितदादा यांचे काही लोक आहेत
त्यांना मला संपवायचे आहे का?
‘मी सागर बंगल्यावर येतो घ्या माझा बळी’
माझ्या विरोधकांना ताकद दिली जातेय..
माझ्या विरोधात माझ्या भागातील काही लोक तयार केले आहेत
10% आरक्षण दिल्यावर गुलाल उधळेल हा त्यांचा अंदाज चुकला..
म्हणून मला बदनाम केले जात आहे…
फडणवीसमुळे अनेकांना BJP पक्ष सोडावा लागला, अनेकांना आपल्या पक्षात फूट पाडावी लागली, अनेक लोक संपवले.
सध्या राज्य फडणवीस हे चालवत आहेत, रास्ता रोको करणाऱ्यावर केसेस दाखल केल्या.
आपण सगळ्यांना खेटत राहिलो आणि ते सगळे सत्तेत आले आहेत.
सरकाला शिव्या दिल्या काय चुकलं?
फूट पाडण्याचा ‘कावा’ माझ्याजवळ चालणार आहे
आता आमचा निश्चय ‘आम्ही आता सगेसोयरेच घेऊ ‘
माझ्या विरुद्ध एकाही महिलेने तक्रार केली असेल तर मी आपण म्हणाल ती सजा भोगेल.
चला.. मी पायी मुंबईला निघालो..
म्हणून जरांगे पाटील तातडीने भर बैठकीतून सागर बंगल्याकडे जायला निघाले. अनेक जणांनी त्यांना विनंती केली परंतु ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
अनेक महिला भगिनी त्यांना विनंती करत होत्या, परंतु जरांगे पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आता सद्यस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे असंख्य मराठा सहकारी हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत.