Mahesh Hanme/MH 13news
संपूर्ण राज्यात सध्याला मराठा आरक्षणाचा विषय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शेकडो किलोमीटर पायी वाटचाल करत अंतरावली सराटी ते मुंबईच्या दिशेने लाखो करोडो मराठा बांधव मिळेल ते वाहन आणि पायी निघालेले आहेत. अनेक जण आझाद मैदान येथे पोहोचलेले असून वाशी येथील बाजार समितीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत ठाण मांडून बसला आहे. आज 26 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता मनोज जरांगे पाटील भूमिका स्पष्ट करणार आहेत शासनाने दिलेला जीआर वाचून दाखवण्याची माहिती त्यांनी दिली.
प्रचंड संख्येने आलेल्या मराठा बांधवांपर्यंत आवाज पोहोचत नसल्यामुळे साऊंड सिस्टिम व्यवस्थित झाल्यावर भूमिका स्पष्ट करणार आहेत.
भर दुपारी ही असंख्य मराठा समाज बांधवांनी संपूर्ण वाशी येथील रस्ते फुलले आहेत. वाशी येथील बाजार समितीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे सुद्धा हजारोच्या संख्येने मराठा बांधव जमा झालेला आहे.
एका मोठ्या ट्रक वर उभारून मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करत होते त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातामध्ये गदा दिली. पाटलांनी गदा फिरवून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला.
अक्षरशः रस्ता दिसत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या मराठा समुदायाला वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांनी जीआर वाचून दाखवणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि क्रांतिवीर अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
माझं उपोषण अकरा वाजता सुरू झालय.
सरकारला काही कागदपत्र आपल्याला दिले आहेत.
ती वाचून दाखवणार आहे.
सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली आहे.
आपण मोकळ्या हाताने परत जात नाही.
तुम्ही लाखाच्या -करोडाच्या संख्येने आलात..
ट्रकवर उभारून मराठा योद्धा जरांगे पाटलांचे भाषण
दोन वाजता मनोज जरांगे पाटील भूमिका स्पष्ट करणार..