Wednesday, April 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

उत्तर मतदारसंघासाठी मराठा नेत्यांची मोर्चेबांधणी..! पाटलांची साथ किंवा अपक्ष..! वाचा..

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
उत्तर मतदारसंघासाठी मराठा नेत्यांची मोर्चेबांधणी..! पाटलांची साथ किंवा अपक्ष..! वाचा..
0
SHARES
498
VIEWS
ShareShareShare

MH 13NEWS NETWORK

उत्तर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. विजयकुमार देशमुख हे गेल्या चार टर्म पासून येथील आमदार आहेत. सर्वसामान्य नागरिकांशी सहज संपर्क ही त्यांची खासियत असून याच उत्तर मतदारसंघात आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी काही मराठा नेते मोर्चेबांधणी करत असल्याचे दिसून येत आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग असणारे राजन जाधव त्यांनी काल शुक्रवारी अंतरवाली सराटीत पाटलांची भेट घेऊन उत्तर मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा केली. याआधी पाटलांकडे त्यांनी आपला उमेदवारी मागणी अर्ज दिला होता. उत्तर मतदार संघ तसेच ग्रामीण भागात राजन जाधव यांचा संपर्क हा दांडगा आहे. जाधव हे परिवहन समितीचे माजी सभापती आहेत.

मराठा आंदोलनातील नेते रवी मोहिते यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिला आहे. जिल्ह्यात जरांगे पाटील गटाच्या इच्छुकांच्या मेळाव्यात मोहिते आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. आरक्षण आंदोलनामध्ये मोहिते यांचा सक्रिय सहभाग असून ते उत्तर मधून इच्छुक आहेत. पाटलांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश होतो.

नुकताच बंडाचा इशारा देणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपच्या पाच जागा आम्ही पाडणार अशी गर्जना केली. उत्तर मतदारसंघातून गरज पडल्यास अपक्ष उभारणार असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शिंदे हे माजी नगरसेवक असून शहरात जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा उभा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती. आम्ही निवडून जरी नाही आलो तर किमान पाडू शकतो. हे त्यांचे वक्तव्य गाजत आहे.

स्वतः इच्छुक नसले तरी ऐनवेळी मराठा नेते माऊली पवार यांच्या उत्तर मधील उमेदवारी बाबत काहीही घडू शकते अशी चर्चा समाजामध्ये आहे. पवार हे जरांगे पाटील यांच्या चळवळीतील प्रमुख चेहरा असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात असणारा प्रचंड मोठा संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. तर उत्तर मतदार संघात मराठा समाजासोबत इतर समाजासोबत त्यांचे स्नेह संबंध आहेत. पवार हे मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.

भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.महाविकास आघाडीकडून माजी महापौर महेश कोठे यांनी तिकीट मिळवले आहे. तिकीट जाहीर होताच दोघांच्या समर्थकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला आहे.

शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर कोठे हे निवडणूक लढवत आहेत.अपक्ष म्हणून माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. बनशेट्टी यांना पक्षामधील असंतुष्ट गटांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

यंदा तगडी फाईट होण्याची चिन्हे असून जर मराठा समाजाचा उमेदवार उभारला तर मतांची विभागणी होऊ शकते.

Tags: Amol shinde ShivsenaElectionmanoj Jarange PatilMarathaMauli pawarRajan jadhavRavi mohitesolapurSolapur Maharashtraउत्तर मतदारसंघमाऊली पवार
Previous Post

मध्य मतदारसंघासाठी मुस्लिम उमेदवार थेट जरांगे पाटलांकडे..! वाचा..

Next Post

‘नेत्या’लाच ‘मध्य’ची उमेदवारी देण्यासाठी मोर्चेबांधणी ; समर्थकांची एकजूट..!

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
‘नेत्या’लाच ‘मध्य’ची उमेदवारी देण्यासाठी मोर्चेबांधणी ; समर्थकांची एकजूट..!

'नेत्या'लाच 'मध्य'ची उमेदवारी देण्यासाठी मोर्चेबांधणी ; समर्थकांची एकजूट..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.