MH 13 NEWS NETWORK
मुंबई :
मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज पार पडली. या बैठकीला सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. मराठा आरक्षण या प्रश्नाची सोडवणूक व्हावी, अशी ठाम भूमिका समिती व राज्य सरकारने घेतली आहे.

मराठा आंदोलक नेते मा. मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच प्रतिनिधी पाठवण्यात येणार असल्याचे ठरले आहे. तसेच आंदोलकांसाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
