Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Matrushakti: स्त्री शक्तीचे जागरण केल्यास समाज परिवर्तन निश्चित  -अलका इनामदार

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
15
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

स्त्री शक्तीचे जागरण केल्यास समाज परिवर्तन निश्चित

राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहीका अलका इनामदार : मातृशक्ती पुरस्काराचे थाटात वितरण

सोलापूर : प्रतिनिधी

वेदकाळापासून भारतीय स्त्रिया सक्षम आणि साक्षर आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये स्त्री शक्ती सुप्त झाली आहे. स्त्रीशक्तीचे पुन्हा एकदा जागरण झाल्यास समाज परिवर्तन निश्चित होईल, असा विश्वास राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहीका अलका इनामदार यांनी व्यक्त केला. श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे देण्यात येणारा यंदाचा मातृशक्ती पुरस्कार अलका इनामदार यांना प्रदान करण्यात आला.



श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठात सोमवारी मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प. पू. जडेसिद्धेश्वर महास्वामीजी, सुधीर इनामदार,
मातोश्री प्रांजलम्मा शिवपुत्र आप्पाजी, ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, मठाचे विश्वस्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी नेपाळ येथील रुद्राक्षांची माळ, मानपत्र, मानाची शाल, पुष्पहार घालून अलका इनामदार आणि सुधीर इनामदार यांचा सन्मान करण्यात आला.

अलका इनामदार म्हणाल्या, जेव्हा जेव्हा समाज गलितगात्र झाला, तेव्हा स्त्रियांनी खंबीरपणे उभे राहून समाजाचे रक्षण केल्याची कित्येक उदाहरणे आहेत. आधुनिक काळात स्त्रियांनी बौद्धिक युद्धात सहभागी होण्याची गरज आहे. समाज परिवर्तनासाठी स्त्रियांनी पुढाकार घेतला तर समाजातील दुष्पवृत्तीचा नाश होऊ शकतो. हिंदुत्वाचा विजय जगभरात होण्यासाठी महिलांचे योगदान आवश्यक आहे. त्याकरिता राष्ट्रसेविका समिती कार्यरत आहे, असेही अलका इनामदार यांनी सांगितले.

मठाचे विश्वस्त सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा कल्याणशेट्टी यांनी सूत्रसंचालन तर गिरीश गोसकी यांनी आभार प्रदर्शन केले.

Tags: ATI RudraMatrushaktiswahakarअतिरुद्र
Previous Post

कौतुकास्पद..! दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरात 5 दिवसात 4 हजार 61 लाभार्थ्यांची तपासणी ;११ तालुक्यात असे आहे नियोजन..!

Next Post

ॐ नमस्ते रुद्र मन्यव उतो त इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः ll अतिरुद्र स्वाहाकारास प्रारंभ..!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

ॐ नमस्ते रुद्र मन्यव उतो त इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः ll अतिरुद्र स्वाहाकारास प्रारंभ..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.