MH 13News Network
शिवस्मारक येथे माजी जिल्हा सरकारी वकील श्री.संतोष न्हावकर यांच्या संकल्पनेतून विधीगंध संस्था व सोलापूर बार असोसिएशन कडून आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट चषक उदघाटन व नामवंत विधिज्ञाच्या स्मृतीप्रित्यर्थ विधीगंध पुरस्कार सोहळा पार पडला. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना नामवंत विधीज्ञाच्या स्मृती जागविल्याने युवा पिढीला प्रेरणा मिळते.वकीलानी क्रिकेट मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, वकील सहसा खेळामध्ये भाग घेत नाहीत , कनिष्ठ वकील व जेष्ठ वकील त्या निमित्ताने एकत्र येऊन खेळल्याने दोघां मध्ये खेळ भावना येण्यास मदत होते असे प्रतिपादन श्री. आझमी यांनी केले.
विधीगंध चषक मध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघ मिळून एकूण १८ संघ सहभागी झालेले असून न्यायाधीशांचा संघ सुद्धा सामील आहे.
या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन व विधीगंध पुरस्काराचे आयोजन करणेत आलेले होते.
याप्रसंगी कै . तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती विधीगंध पुरस्कार हा अॅड. एन. आर. खंडाळ यानां त्यांनी आपल्या सहाय्यक सरकारी वकीलपदाच्या कार्यकाळात तब्बल ३५० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा घेऊन सशक्त सरकारी वकिलाची भूमिका निभावल्या बद्दल देण्यात आला. तर कै ए. तू. माने यांच्या स्मृती प्रित्यर्थ विधीगंध पुरस्कार भारत कट्टे यांना त्यांनी त्यांच्या सहाय्यक सरकारी वकीलपदाच्या कार्यकाळात 113 आरोपींना शिक्षा घेऊन केलेल्या कार्या बद्दल तर कै. ए. डी. ठोकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ऍड. आब्बास काझी यांना जिल्हा सरकारी वकील म्हणून दिलेल्या योगदाना बद्दल व आपल्या वकिलीत केलेल्या अतुलनीय कार्या बद्दल पुरस्कार प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. आझमी यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
यावेळी कै. ए.तू. माने यांनी इंद्रभुवन इमारत खासगी व्यक्तीने विकत घेण्यास रोखून ती सरकारने विकत घेण्यास भाग पाडल्याने आज आपण तिथे महानगरपालिका पाहात आहोत तसेच महात्मा गांधी यांना अटक झाल्याने केलेल्या आंदोलनात एक रुपया शिक्षा झाल्याने सरकारी नोकरीस मुकावे लागले असे प्रतिपादन अँड. संतोष न्हावकर यांनी केले तसेच त्यांनी कै. अशोक ठोकडे व कै. तात्यासाहेब नेर्लेकर यांच्या विविध आठवणी सांगून स्मृती जागवल्या.
याप्रसंगी क्रिकेट स्पर्धेच्या टी शर्ट चे अनावरण करणेत आले व प्रमुख न्यायाधीश यांच्या हस्ते पहिल्या सामन्याचा टॉस करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघास कै ॲड जी. एन. रजपूत यांच्या स्मृती प्रित्यर्थ विजेता चषक देण्यात येणार असून, उपविजेता संघास कै ॲड जयकुमार काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उपविजेता चषक, तसेच मॅन ऑफ द सिरीज चषक कै ॲड आर. जी. देशपांडे यांचे स्मृती पित्यर्थ व बेस्ट बॅट्समन चषक कै ॲड जी. एस. आडम यांचे स्मृती प्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे
या प्रसंगी व्यासपीठावर विधीगंध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. श्री. संतोष न्हावकर, श्री. एम. एस. आझमी ,जिल्हा प्रमुख न्यायाधीश, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. श्री. सुरेश गायकवाड, जेष्ठ वकील विजय मराठे, जेष्ठ वकील धनंजय उर्फ आबासाहेब माने हे उपस्थित होते सोबतच संपूर्ण जिल्हा तुन आलेले वकील खेळाडू, जेष्ठ व कनिष्ठ वकील बंधू भगिनी मोठ्या उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा गव्हाणे यांनी तर आभार ऍड. मंजुनाथ ककलमेली यांनी मानले.