MH 13 NEWS NETWORK
हत्तुर येथे आयोजित सभेला प्रचंड गर्दी
सोलापूर
सन 2014 आणि 2019 ला तुम्ही मतांच्या रुपात आशीर्वाद दिले आहेत त्याप्रमाणे आपण तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे आता 2024 ला पण मतांच्या रुपात आशीर्वाद द्यावेत त्याची येणाऱ्या काळात उत्तराई नक्की करेन. आम्ही विरोधी पक्षांसारखे आश्वासन देत नाही तर प्रत्यक्षात कृती करतो असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
हत्तुर (ता. दक्षिण सोलापूर) येथे आयोजित जाहीर सभेत आमदार सुभाष देशमुख बोलत होते. गुरुवारी आमदार सुभाष देशमुख यांनी मनगोळी, अकोले मंद्रूप, गुंजेगाव, कंदलगाव, वडापूर कुसुर तेलगाव, विंचूर, निम्बर्गी आदी भागात दौरा केला.
दक्षिण तालुक्याचा दहा वर्षात चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. येथील सोमेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे आम्ही जे बोलतो तेच करतो. न होणारे न पूर्ण होणारे आश्वासन कधीच देत नाही. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, जातीपातीचे राजकारण न करता जनतेने पुन्हा एकदा महायुतीला साथ द्यावी. मला तिसऱ्यांदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी. निश्चितच दहा वर्षात जेवढा विकास झाला तेवढा विकास येत्या पाच वर्षात करण्याची ताकद मला पुन्हा द्यावी असेही आमदार देशमुख म्हणाले. प्रारंभी हातुर गावात आमदार सुभाष देशमुख यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यामुळेच दक्षिण तालुक्याचा विकास झाल्याचे सांगत त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे अभिवचन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हणमंत कुलकर्णी, चनगोंडा हाविनाळे,नामदेव पवार,अंबिका पाटील,अप्पासाहेब मोटे,यतीन शहा राजेंद्र कुलकर्णी, धर्मराज राठोड, गुरुप्पा कुलकर्णी, बनसिद्ध भरले, राजशेखर सलगरे, अशोक कनपवाडीयार, बनसिध्द अमोगी, पटेवाडीयार, सोमनाथ ढगे, स्वप्नील पाटील, राजशेखर पाटील, कांतप्पा पावटे, महादेव कुलकर्णी, प्रकाश भरले, शिवानंद पाटील, सिद्धाराम भिंगे, सोमनिंग व्हनमाने, महेश कनपवाडीयार, राम पुजारी, प्राजक्ता निंबर्गी, श्रीशैल हिरेमठ, मारुती कुंभार, कांचन कुंभार, सिद्धाराम कानडे, अमोगी गुंडगे आदी उपस्थित होते. कंदलगाव येथे
याप्रसंगी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके,हणमंत कुलकर्णी,अंबिका पाटील,नामदेव पवार,अप्पासाहेब मोटे,कोले सर,प्रशांत कडते, शरीफ शेख,महादेव व्हनमाणे, वैभव कुलकर्णी, प्रकाश कोरे,श्रीकांत बनसोडे,तुकाराम शेजाळे, भीम बंडगर व ग्रामस्थ उपस्थित होते