MH 13 News Network
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव बसण्णा कोगनुरे यांच्या प्रचार दौऱ्याला वेग आला असून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केली.
शनिवार दि 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे हे दक्षिण सोलापूर मध्ये गाव भेट, कॉर्नर सभा माध्यमातून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहेत.
नांदणी,औज मंद्रूप, बरुर,कारकल,हत्तरसंग,लंवगी,चींचपुर, सादेपुर, टाकळी,बाळगी,कुरघोट,आनंद नगर आदी गावातून महादेव कोगनुरे यांचा दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला.
या गावभेट दौऱ्यात युवक,महिला,वयोवृद्ध नागरिक,शेतकरी ,शेतमजूर ,व्यापारी ,नोकरदार वर्ग महादेव कोगनुरे यांना प्रतिसाद देताना दिसून आले.
युवकांसाठी रोजगार निर्मिती करून या भागातील एमआयडीसीसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वसामान्य माणसांच्या सुख दु:खात सहभागी होणारा आपला उमदेवार असून यंदा जनता मला संधी देईल. नक्कीच निवडून येणार असल्याची प्रतिक्रिया महादेव कोगनुरे यांनी दिली. गावोगावी कोगनुरे यांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे फटाक्यांचे आतषबाजी करीत सामान्य नागरिक यांच्याशी जनसंवाद करताना कोगनूरे हे विकासाच्या मुद्द्यावर बोलत असताना या भागाचा कायापालट करू असे आश्वासन देत आहेत.
गाव भेट दौरा, कॉर्नर सभा, होम टू होम प्रचार करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व एम के फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.