mh 13 news network
सोलापूर | प्रतिनिधी
गणेशोत्सव व शिक्षक दिनानिमित्त पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, पी. आर. चेस वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय १५ वर्षाखालील जलद गती बुद्धिबळ स्पर्धा अक्कलकोट रोडवरील बोमड्याल मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक भागातून बालगोपाळ खेळाडूंनी सहभाग घेतला. फिडेच्या स्विस लीग नियमानुसार खेळाडूंच्या संख्येनुसार ५ ते ७ फेऱ्यांमध्ये सामने घेण्यात आले. प्रत्येक खेळाडूला १० मिनिटांचा वेळ आणि प्रत्येक चालीला २ सेकंद अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.

स्पर्धेत एकूण ३६ हजार रुपयांची १०० हून अधिक पारितोषिके वाटप करण्यात आली. यामध्ये २१ रोख पारितोषिके, ५० चषक आणि ५० पदके यांचा समावेश होता. प्रत्येक सहभागी खेळाडूला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे संचालन आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी, वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा, सहमुख्य पंच जयश्री कोंडा, सहाय्यकार्बेटर प्रज्वल कोरे व दिलीप तुम्मा यांनी केले. स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडूंना चहा व अल्पोपहाराची सोय आयोजकांनी केली होती.
या प्रसंगी गणेशोत्सव महामंडळाचे विश्वस्त प्राध्यापक अजय दासरी, पांडुरंग काका दिड्डी, व्यंकटेश आकेन, अध्यक्ष विनोद केंजरला, अध्यक्ष लोकेश नंदाल, उपाध्यक्ष प्रविण जिल्ला, शुभम एक्कलदेवी, सचिव विजय निली, खजिनदार मनोज पिस्के, प्रसिद्धी प्रमुख गिरीश गोसकी, श्रीनिवास आडम, निखिल चेन्नूर, संतोष क्यातम, कृष्णा बुर्ला आदी मान्यवर उपस्थित होते.