MH 13 News Network
रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाची सांगता
पौर्णिमेनिमित्त मसरे कुटुंबीयांतर्फे प्रसाद वाटप
सोलापूर दि. १७- येथील सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांची पौर्णिमेनिमित्त देवी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी श्री रूपाभवानी देवी मंदिर, ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे उपस्थित होते.
तत्पूर्वी मंदिरात पहाटे काकडआरती, दूध आणि दह्याचा अभिषेक करून महाआरती करण्यात आली. नवरात्रीत मंदिरामध्ये दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता. रात्री देवीची महाआरती करून छबिना मिरवणूक काढून उत्सवाची सांगता करण्यात आली.
या मिरवणुकीत भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते. हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीतील दिवस अत्यंत पवित्र मानले जातात.
नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशेष रंग देण्यात आला आहे.जो दुर्गा देवीच्या रूपाशी संबंधित आहे. यामध्ये नऊ दिवस शक्तीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यात आली. देवीच्या प्रत्येक रूपाला मसरे कुटुंबीयांच्यावतीने तिचा आवडता नैवेद्य दाखवून शेवटी उत्सवाची सांगता झाली.