MH 13 News Network
भर उन्हाळ्यात सोलापूरकरांना पाण्यासाठी भटकावे लागते. कधी चार तर कधी पाच दिवसानी पाणी येते. सोलापुरात पाण्याचा दिवस हा शब्द प्रसिद्ध झाला आहे. यावर छोटासा प्रयत्न म्हणून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने प्रभाग पाच मध्ये पाच बोअरवेल देऊन तहानलेल्या रहिवाशांसाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक ५ च्या वतीने तसेच माजी नगरसेवक सुभाषमामा डांगे,बिज्जुआण्णा प्रधाने, माजी नगरसेविका मंदाकिनी ताई तोडकरी, माजी नगरसेविका कल्पनाताई क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून अंबिका नगर बाळे येथील बाबा शेख यांच्या घरासमोर बोअर घेण्यात आला.

यावेळी उपस्थित नागरिकांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी बिज्जुआण्णा प्रधाने,मंदाकिनीताई तोडकरी,नागनाथमेंबर क्षिरसागर,सुरेशमेंबर तोडकरी,मंजुषाताई डोईफोडे,बाळासाहेब तांबे,शिवाजी कोयाळकर,बाबा शेख मोहन भोसले,संभाजी कोयाळकर,पिंटु पसारे,राहुल कदम,सुग्रीव जाधव,सैफन मुजावर,असिफ पठाण,आप्पा कवडे,बापू कोयाळकर,अविनाश चाफेकर,मधुकर चाफाकरंडे,प्रताप भगाडे,बाबु भवर,दत्ता सर्वगोड,खंडु शिंदे, धनु शिंदे,बापु वाघमारे,सागर भोसले,बबलु PB पठाण,पृथ्वीराज माने PM,अभिजीत भोसले, सुरज सर्वगोड,गंगाताई कोयाळकर लक्ष्मीमावशी भगाडे,अंजनाबाई सरवदे,निर्मलाताई गावडे, हसीना ताई मुजावर,सुनिताताई शिंदे,कविताताई सर्वगोड, सोनमताई पवार,उर्मिलाताई कोयाळकर,शैलाताई वाघमोडे, रेखाताई भोसले,सुनिताताई भोसले,लताताई भोसले आदी उपस्थित होते.

बाळे भागात अंबिका नगर या ठिकाणी दोन, संतोष नगर या ठिकाणी एक, जय मल्हार नगर या ठिकाणी दोन बोअरवेल घेण्यात आले आहेत. या भागातील रहिवाशांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी पक्षाच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पक्षप्रमुख अजितदादा पवार, सुनील तटकरे, आणि वरिष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू राहील. तसेच भविष्यात ही विविध समाजोपयोगी कार्य करण्यात येतील.
बिज्जु (आण्णा) प्रधाने, युवा नेते